आयपीएलमध्ये दोन नवीन संघ सामील केले गेले आहेत आणि २०२२ हंगामापूर्वी मेगा लिलाव आयोजित केला जाणार आहे. तत्पूर्वी बीसीसीआयने संर्व आयपीएल फ्रेंचायझींना या मेगा लिलावापूर्वी फक्त चार खेळाडूंना संघात कायम (रिटेन) ठेवण्याची परवानगी दिली आहे. अशात फ्रेंचायझींना इच्छा नसताना देखील संघातील महत्वाच्या खेळाडूंना रिलीज करावे लागले आहे. मुंबई इंडियन्सनेही हार्दिक पांड्या आणि ईशान किशनसारख्या महत्वाच्या खेळाडूंना संघातून बाहेर केले. आता न्यूझीलंड संघाचे माजी कर्णधार डॅनियल विटोरी यांनी मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला रिलीज करण्यामागच्या काही कारणांचा खुलासा केला आहे.
हार्दिक पांड्या आणि ईशानन किशनने त्यांच्या आयपीएल कारकिर्दीची सुरुवात मुंबई इंडियन्स संघासोबत केली आणि स्वतःची एक वेगळी ओळख तयार केली. असे असले तरी पुढच्या हंगामापूर्वी मुंबई इंडियन्सला संघातून बाहेर करावे लागले. अशात डॅनियल विटोरी यांनी हार्दिकला संघातून बाहेर करण्यामागचे कारण स्पष्ट केले आहे. याबाबतीत बोलताना त्यांनी हार्दिकला संघातून बाहेर करण्यामागे पैशाचे कारण असल्याचे सांगितले.
याबाबतीत ईएसपीएन क्रिकइंफोसोबत बोलताना विटोरी म्हणाले की, “ही स्पष्टपणे पैशाची गोष्ट आहे, हे पैशांच्या बातीतच असायला हवे. असे होऊच शकत नाही की, मुंबई इंडियन्स हार्दिक पांड्याला रिटेन करू इच्छित नसेल. प्रत्येक फ्रेंचायजी त्याला संघात सामील करू इच्छिते. पण मुंबई संघ त्याला रिटेंशनच्या यादीत तिसऱ्या क्रमांकाची ऑफर देऊ शकला असेल, कारण बुमराह आणि रोहित यांना पहिल्या दोन स्थानांसाठी योग्य प्रकारे रिटेन केले आहे.”
त्यांनी पुढे बोलताना यामागचे दुसरे कारण देखील सांगितले. त्यांच्या मते हार्दिकला दुसऱ्या खेळाडूंसोबत खेळण्याची इच्छा असू शकते. तसेच तो आणि केएल राहुल येत्या काळात एकत्र खेळताना दिसू शकतात, असेही त्यांनी सांगितले.
ते म्हणाले की, “असे असू शकते की, हार्दिक पांड्याला वाटत असेल की, तो आता खूप परिपक्व झाला आहे आणि काही गटबाजी देखील होत असेल. हे देखील एक कारण असू शकते की, केएल राहुल आणि हार्दिक यांच्या मैत्रीविषयी आपल्या सर्वांना माहिती आहे. अशात जर काही संधी तयार होत असेल, तर ते एकत्र खेळू शकतात, त्यासाठी त्यांनी हा निर्णय घेतला असू शकतो. याबाबतीत आपल्याला येत्या काळात संपूर्ण माहिती मिळू शकेल.”
महत्त्वाच्या बातम्या –
२१ व्या शतकातील पहिला ‘परफेक्ट टेन’ घेणारा देबाशिष मोहंती विस्मृतीत गेलाय
टीम इंडियाचं फुटकं नशीब! दक्षिण आफ्रिकेविरुद्ध हाता तोंडाशी आलेला विजय निसटला, दुसरा कसोटी अनिर्णित
कडक सॅल्युट! काल ज्या भिंतीवरचा इतिहास वाचत होता, आज त्याच भिंतीवर त्याने स्वतःच नाव कोरलंय