आज(१० जानेवारी) भारत विरुद्ध श्रीलंका संघात टी२० मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडीयम, गहुंजे येथे खेळवला जाईल.
आत्तापर्यंत गहुंजेच्या या स्टेडीयमवर ८ आंतरराष्ट्रीय सामने झाले आहेत. या सर्व ८ सामन्यात भारतीय संघ खेळला आहे. यामध्ये ४ वनडे, २ टी२० आणि २ कसोटी सामन्यांचा समावेश आहे. मात्र भारताला या ८ सामन्यांपैकी केवळ ४ सामनेच या मैदानावर जिंकता आले आहेत.
असे असले तरी मात्र हे मैदान भारताचा कर्णधार विराट कोहलीसाठी खास ठरले आहे. तो या मैदानावर सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. त्याने आत्तापर्यंत ७ सामने या मैदानावर खेळताना ८६.७१ च्या सरासरीने ६०७ धावा केल्या आहेत. यामध्ये त्याच्या १ द्विशतक २ शतकांचा आणि १ अर्धशतकाचा समावेश आहे.
विराटने त्याची ही २ शतके इंग्लंड विरुद्ध आणि वेस्ट इंडीज विरुद्धच्या वनडे सामन्यात केली आहेत. तसेच त्याने द्विशतक दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या कसोटी सामन्यात केले आहे.
त्याने मागीलवर्षी ऑक्टोबरमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध या मैदानावर कसोटी सामना खेळताना नाबाद २५४ धावांची खेळी केली होती. ही त्याची कसोटी कारकिर्दीतील आत्तापर्यंतची सर्वोत्तम वैयक्तिक खेळी आहे. त्याचबरोबर त्याने या मैदानावर ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या वनडे सामन्यात 1 अर्धशतकही केले आहे.
मात्र विराटने या मैदानावर केवळ १ टी२० सामना खेळला आहे. यात त्याला २१ धावाच करता आल्या आहेत. त्यामुळे या मैदानावरील टी२०मधील कामगिरीत सुधारणा करण्याचा त्याचा प्रयत्न असेल.
पण एकूणच विराटची गहुंजेच्या या मैदानावरील कामगिरी चांगली झालेली आहे. त्यामुळे विराट आज होणाऱ्या टी२० सामन्यात या मैदानवरील चांगल्या कामगिरीत सातत्य ठेवतो का हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडीयमवर सर्वाधिक धावा करणारे फलंदाज (आंतरराष्ट्रीय सामने) –
६०७ धावा – विराट कोहली (७ सामने)
१३६ धावा – स्टिव्ह स्मिथ (१ सामना)
१२६ धावा – रविंद्र जडेजा (६ सामने)
१२० धावा – शिखर धवन (५ सामने)
१२० धावा – केदार जाधव (२ सामने)
११३ धावा – अजिंक्य रहाणे (४ सामने)
…म्हणून बेन स्टोक्स दुमडतो मधलं बोट, हे आहे कारण
वाचा👉https://t.co/ZHQoi1c3qQ👈#म #मराठी #Cricket #SAvsENG @benstokes38
— Maha Sports (@Maha_Sports) January 10, 2020
टी२० विश्वचषकासाठी अशी आहे व्हीव्हीएस लक्ष्मणची टीम इंडिया
वाचा👉https://t.co/o3tOJogzbr👈#म #मराठी #Cricket @VVSLaxman281
— Maha Sports (@Maha_Sports) January 10, 2020