आशिया चषकातील (Asia Cup) सुपर फोरचा पाचवा सामना गुरूवारी (8 सप्टेंबर) भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात खेळला जाणार आहे. हा सामना दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम येथे खेळला जाणार आहे. दोन्ही संघ या स्पर्धेबाहेर पडल्याने हा आता औपचारिक सामना राहिला आहे. या सामन्यात अफगाणिस्तानने नाणेफेक जिंकली असून त्यांनी भारताला प्रथम फलंदाजी करण्याचे आव्हान दिले आहे.
स्पर्धेतील शेवटच्या सामन्यात भारताचे नेतृत्व केएल राहुल (KL Rahul) करणार आहे. तर नियमित कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याला आराम दिला आहे. संघामध्ये दीपक चाहर (Deepak Chahar), दिनेश कार्तिक (Dinesh Karthik) आणि अक्षर पटेल यांचे पुनरागमन झाले आहे. रोहित बरोबर युझवेंद्र चहल आणि हार्दिक पंड्या हे दोघेही या सामन्यात खेळणार नाही.
A look at our Playing XI for the game.
Live – https://t.co/QklPCXU2GZ #INDvAFG #AsiaCup2022 pic.twitter.com/QHicRuYneJ
— BCCI (@BCCI) September 8, 2022
तसेच पाकिस्तान विरुद्ध बुधवारी (7 सप्टेंबर) खेळलेला अफगाणिस्तानचा संघ कायम आहे.
🚨 Starting XI 🚨
We are going with the same team from our last game. Our full starting XI ⬇️#AfghanAtalan | #AsiaCup2022 | #AFGvIND pic.twitter.com/Phb6jpgEga
— Afghanistan Cricket Board (@ACBofficials) September 8, 2022
सामन्यासाठी दोन्ही संघाची प्लेइंग 11
भारत – केएल राहुल (कर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत (विकेटकीपर), दीपक हुड्डा, दिनेश कार्तिक, दीपक चाहर, अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंग.
अफगाणिस्तान- मोहम्मद नबी(कर्णधार), हजरतुल्ला झझई, रहमानउल्ला गुरबाज(विकेटकीपर), इब्राहिम झद्रान, नजीबुल्ला झद्रान, करीम जनात, राशीद खान, अजमतुल्ला उमरझाई, मुजीब उर रहमान, फरीद अहमद मलिक, फझल हक फारुकी.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
रिषभचा पत्ता कट? कार्तिकसह हा यष्टीरक्षक खेळणार वर्ल्डकप; बीसीसीआय सूत्रांची माहिती
अवघ्या 195 धावांचा बचाव करत ऑस्ट्रेलियाचा 113 धावांनी दणदणीत विजय; मालिकाही केली नावावर
नसीम शाहमूळे शास्त्रींना आठवला 36 वर्षापूर्वीचा ‘तो’ सामना; बाबरला म्हणाले थँक्यू