जगातील पहिल्या ऑगमेंटेड रिअॅलिटी क्रिकेट एनएफटी प्लॅटफॉर्म – क्रिकफ्लिक्सची भव्य आणि शानदार सुरुवात झाली आहे. पहिल्या तासातच एकूण १.३८ कोटी रुपयांचे सामान विकले गेले आहे. यात भारताच्या पहिल्या अर्थात १९८३ विश्वचषकाची प्रतिकृती १,१०,००० डॉलर म्हणजेच सुमारे ८२ लाख रुपयांना विकली गेली आहे. याशिवाय कसोटीत सर्वाधिक बळी घेणाऱ्या श्रीलंकेचा महान ऑफस्पिनर मुथैया मुरलीधरनच्या शेवटच्या कसोटी सामन्यातील चेंडूचाही लाखो रुपयांना लिलाव झाला आहे.
सन १९८३ च्या विश्वचषकाची प्रतिकृती एहसान मोरावेझ नावाच्या व्यक्तीने खरेदी केली आहे. हा चषक चांदीचा बनवलेला होता आणि हिऱ्यांव्यतिरिक्त अनेक मौल्यवान रत्नेही त्याला जोडलेली होती. त्याचवेळी, मुरलीधरनच्या शेवटच्या कसोटी सामन्यातील चेंडूसाठी दाहम अरंगला याने ३० लाख रुपये खर्च केले आहेत. याशिवाय १९८३ चा विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय संघाच्या खेळाडूंनी स्वाक्षरी केलेले टी शर्ट देखील ५ हजार डॉलर्सची किंमत देऊन खरेदी करण्यात आले आहेत. तसेच २०१६ मध्ये विश्वचषक जिंकणाऱ्या वेस्ट इंडिज संघाची एक बॅटही विकली गेली आहे. या बॅटवर वेस्टइंडिज संघाच्या खेळाडूंची स्वाक्षरी होती.
या विविध वस्तू जगभरातील क्रिकेट चाहत्यांसाठी ऐतिहासिक आहेत आणि ज्यांनी त्या विकत घेतल्या आहेत त्यांच्यासाठी हा आनंद स्वर्गीय आहे. भारताच्या १९८३ च्या विश्वविजेत्या संघाने स्वाक्षरी केलेल्या बॅटचे महत्त्व किंवा गॅरी सोबर्स, विवियन रिचर्ड्स आणि सुनील गावसकर यांच्यासारख्या दिग्गज खेळाडूंच्या स्वाक्षरी केलेले छायाचित्रे ह्या गोष्टी चाहत्यांसाठी खूप महत्त्वाच्या असतात.
क्रिकफ्लिक्स हे एक व्यासपीठ आहे, जे कोणत्याही कलाकृती किंवा ऐतिहासिक क्षणांशी संबंधित गोष्टींचे डिजिटल रूपांतरण करते. या गोष्टी डिजिटल रूपात बदलल्यानंतर, ते व्हर्च्युअल रिअॅलिटीद्वारे अगदी खऱ्या स्वरूपात सजेच्या तसे बनवले जातात. यामुळे लाखो एनएफटी चाहत्यांना डिजिटली क्रिकेट सामन्याशी संबंधित वस्तू गोळा करण्याची संधी मिळते. वास्तविक, एनएफटीचे एक डिजिटल प्रकारचे टोकन असते, ज्याची कॉपी करता येत नाही आणि क्रिप्टोकरन्सीप्रमाणे बदलता येत नाही.
महत्त्वाच्या बातम्या-
आयपीएलमध्ये १४ वर्षात कोणाला न जमलेली कामगिरी मोहम्मद नबीच्या नावावर
ईशान-रोहितच्या वादळात हैदराबाद भुईसपाट; सलीमी जोडीने नवा विक्रम केला प्रस्थापित