राहुल द्रविड नंतर भारतीय संघाचा नवा मुख्य हेड कोच गाैतम गंभीर आपल्या पदाच्या कार्यकाळाची सुरुवात आगमी श्रीलंका दाैऱ्यापासून करणार आहे. या दाैऱ्याला 27 जुलै पासून सुरुवात होईल. ज्यामध्ये टीम इंडिया श्रीलंका विरुद्ध तीन टी20 आणि तेवढेच वनडे सामन्यांची मालिका खेळणार आहे. बीसीसीआयने घोषित केलेले भारतीय संघ आणि सोबत हेड कोच आज (22 जुलै) श्रीलंकेला रवाना होतील. त्याआधी गाैतम गंभीर पहिल्यांदाच मीडियाला संबोधित करणार आहे. त्याच्या सोबत निवडकर्ता अजित आगरकर सुद्धा उपस्थितीत असणार आहे. तर आात या दरम्यान चाहत्यांना पडलेल्या अनेक प्रश्नांची उत्तरे या पत्रकार परिषदेतून मिळणार आहे. आश्या परिस्थितीत प्रत्येकाची नजर या पत्रकार परिषदेवर राहणार आहे. चला तर मग गाैतम गंभीरच्या या पत्रकार परिषदेतील महत्त्वपूर्ण गोष्टींवर नजर टाकुयात-
टीम इंडियाचे नवे हेड कोच गाैतम गंभीर यांची पत्रकार परिषद आज (22 जुलै) सकाळी 10 वाजता मुंबई येथील बिकेसी मध्ये होणार आहे. ही पत्रकार परिषद चाहत्यांना लाइव्ह पाहता येणार आहे. स्टार स्पोट्स आणि जियो सिनेमा यांच्याद्वारे याचे थेट प्रक्षेपण केले जाईल. या पत्रकार परिषदेनंतर भारतीय संघ आणि सपोर्ट स्टाफ आजच (22 जुलै) श्रीलंकेला रवाना होणार आहे.
श्रीलंकेदाैऱ्यासाठी भारतीय संघाचे वेळापत्रक
27 जुलै – पहिला टी20, संध्याकाळी 7 वाजता, पल्लेकेले
28 जुलै – दुसरी टी20, संध्याकाळी 7 वाजता, पल्लेकेले
30 जुलै – तिसरी टी20, संध्याकाळी 7 वाजता, पल्लेकेले
2 ऑगस्ट – पहिली वनडे, दुपारी 2.30 वाजता, कोलंबो
4 ऑगस्ट – दुसरी वनडे, दुपारी 2.30 वाजता, कोलंबो
7 ऑगस्ट – तिसरी वनडे, दुपारी 2.30 वाजता, कोलंबो
भारतीय टी20 संघ:
सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, रिंकू सिंग, रियान पराग, रिषभ पंत (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, खलील अहमद, मोहम्मद सिराज.
भारताचा एकदिवसीय संघ
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), विराट कोहली, केएल राहुल, रिषभ पंत (यष्टीरक्षक), श्रेयस अय्यर, शिवम दुबे, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, वॉशिंग्टन सुंदर, अर्शदीप सिंग, रायन पराग, अक्षर पटेल, खलील अहमद, हर्षित राणा.
महत्त्वाच्या बातम्या-
ENG vs WI: 20 वर्षीय गोलंदाजापुढे वेस्ट इंडिजची शरणागती! इंग्लंडने केले 241 धावांनी पाहुण्या संघाचा पराभव
भारताविरुद्धच्या पराभवानंतर पाकिस्तानचा नेपाळवर 9 विकेट्सनं शानदार विजय
कसोटी क्रिकेटमध्ये शतक झळकावून रुटनं केली ‘या’ दिग्गज खेळाडूंची बरोबरी