भारत आणि श्रीलंका (IND vs SL T20 series) यांच्यातील टी-२० मालिका गुरुवारी (२४ फेब्रुवारी) सुरू झाली. मालिकेतील पहिला सामना लखनऊमध्ये खेळला गेला असून, यामध्ये भारताने ६२ धावांनी विजय मिळवला. कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याच्या नेतृत्वातील भारतीय संघाने फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्हीमध्ये चांगले प्रदर्शन केले आणि मालिकेतील पहिला विजय मिळवला. रोहित शर्माने जेव्हापासून कर्णधारपदाची जबाबदारी स्वीकारली आहे, तेव्हापासून संघाच्या प्रदर्शनात एकंदरित सुधारणा दिसू लागली आहे.
कर्णधाराच्या रूपातील रोहित शर्माचे मायदेशात खेळलेल्या टी-२० सामन्यांमधीला आकडे शानदार आहेत. रोहित शर्माच्या नेतृत्वात भारतीय संघाने मायदेशात आतापर्यंत १६ टी-२० सामने खेळले आहेत. त्यापैकी १५ सामने संघाने जिंकले, तर एकामध्ये पराभव पत्करावा लागला आहे.
त्यामुळे मायदेशात सर्वाधिक टी-२० सामने जिंकणाऱ्या कर्णधारांमध्ये रोहित शर्माने इंग्लंडचा कर्णधार ओएन मॉर्गन आणि न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सन यांची बरोबरी केली आहे.
मॉर्गननेही इंग्लंडला मायदेशातील १५ टी-२० सामने जिंकवून दिले आहेत. परंतु ही कामगिरी करण्यासाठी त्याने एकूण २५ सामन्यात नेतृत्त्व केले आणि त्यापैकी ९ सामन्यात पराभव स्वीकारला आहे. त्याव्यतिरिक्त न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सननेही मायदेशात स्वतःच्या संघाचे नेतृत्व करताना १५ टी-२० सामने जिंकले. पण त्याने हे सामने जिंकण्यासाठी एकूण ३० सामन्यांमध्ये नेतृत्व केले आणि १४ सामन्यात पराभव पत्करावा लागला आहे.
ऑस्ट्रेलियाचा कर्णधार ऍरॉन फिंच या यादीत चौथ्या क्रमांकावर आहे. फिंचने ऑस्ट्रेलिया संघासाठी मायदेशात २५ टी-२० सामन्यांमध्ये नेतृत्व केले आणि त्यापैकी १४ जिंकले आहेत. भारताचा माजी कर्णधार विराट पाचव्या क्रमांकावर आहे, ज्याने मायदेशात १३ टी-२० सामन्यांमध्ये संघाला विजय मिळवून दिला आहे. ही कामगिरी करण्यासाठी विराटला मायदेशातील २३ सामन्यांमध्ये संघाचे नेतृत्व करावे लागले आहे.
मायदेशात सर्वाधिक आंतरराष्ट्रीय टी-२० विजय मिळवणारे कर्णधार
१. रोहित शर्मा – १५ विजय – (एकूण सामने १६) (पराभूत सामने १)
२. ओएन मॉर्गन – १५ विजय – (एकूण सामने २५) (पराभूत सामने ९)
३. केन विलियम्सन – १५ विजय (एकूण सामने ३०) (पराभूत सामने १४)
४. एरॉन फिंच – १४ विजय (एकूण सामने २५) (पराभूत सामने ९)
५. विराट कोहली – १३ विजय (एकूण सामने २३) (पराभूत सामने ९)
दरम्यान, पहिल्या टी-२० सामन्यात विजय मिळवून भारतीय संघाने मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. उभय संघातील दुसरा आणि तिसरा टी-२० सामना धरमशालामध्ये २६ आणि २७ फेब्रुवारीला खेळले जातील. टी-२० मालिकेनंतर उभय संघात दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळली जाईल.
महत्वाच्या बातम्या –
पहिले षटक आणि भुवीची विकेट! निसंकाला गोल्डन डकवर बाद करताच भुवनेश्वरची अनोख्या विक्रमाला गवसणी
क्रिकेटच्या डॉनने २१ वर्षांपूर्वी घेतलेला अखेरचा श्वास, वाचा त्यांच्याबद्दलच्या खास गोष्टी
संघातून बाहेर असलेल्या केएल राहुलसाठी ‘हा’ खेळाडू बनलाय धोका; विस्फोटक अंदाजात पाडतोय धावांचा पाऊस