आयसीसी टी20 विश्वचषकाच्या 9 व्या हंगामास 2 जून पासून सुरुवात होणार आहे. भारतीय संघ 2007 साली झालेल्या पहिल्या टी20 विश्वचषकाच्या पहिल्या आवृत्तीमध्येच विजेतेपद पटकावलं होते. त्यानंतर भारतीय संघास खिताब जिंकण्यात यश मिळालेला नाही. दरवेळी विश्वचषकापूर्वी टीम इंडीया फेव्हरेट असते. पण विश्वचषकातील नाॅक आऊट सामन्यात संघास पराभवास सामोरे जावे लागते. 2014 साली टीम इंडीयाला फायनलमध्ये श्रीलंका विरुद्ध पराभव स्वीकारावे लागले होते. 2022 मध्ये देखील सेमी फायनल मध्ये इंग्लंडने भारताचा दारुण पराभव केला होता.
आता या सगळ्यांचा बदला घेण्यासाठी टीम इंडीया मैदानात उतरणार आहे. पण यंदाच्या विश्वचषकातील काही खेळाडूंचा शेवटचा हंगाम असणार आहे. 2007 साली झालेल्या विश्वचषकाचा हिस्सा असलेला फक्त एकच खेळाडू यंदाच्या विश्वचषकाचा भाग असणार आहे. तो म्हणजे रोहित शर्मा.सध्याच्या संघात असे अनेक खेळाडू आहेत जे 35 वर्षांचे झाले आहेत आणि त्यांनी यावेळी विजेतेपद पटकावले नाही तर त्यांची कारकीर्द ट्रॉफीशिवाय संपू शकते.
टी20 विश्वचषकात कोहलीच्या नावावर सर्वाधिक धावा (1141) पासून, असे अनेक विक्रम आहेत. ज्यामध्ये विराट अव्वल स्थानावर आहे. या 35 वर्षीय भारताच्या संकटमोचकाच्या नावे टी-20 विश्वचषकचा मुकुट नाही. 2024 नंतर पुढील विश्वचषक 2026 मध्ये होणार आहे. तोपर्यंत विराट 37 वर्षांचा झाला असेल. अश परिस्थितीत 2026 च्या भारतीय टी-20 संघात कोहलीला संधी मिळेल, असे पूर्ण आत्मविश्वासाने सांगता येणे अवघड आहे.
कोहलीप्रमाणेच रवींद्र जडेजाही 35 वर्षांचा झाला आहे. विराटने एकदिवसीय विश्वचषक जिंकला आहे, पण जडेजाच्या नावावर कोणत्याही फॉरमॅटमध्ये विश्वचषक नाही. जडेजाचा फिटनेस उत्कृष्ट आहे. पण दुखापतीमुळे तो अनेकवेळा संघाबाहेर पडला आहे. अशा परिस्थितीत जडेजासाठी टी-20 विश्वचषक जिंकण्याची ही शेवटची संधी मानली जात आहे.
युझवेंद्र चहल 2024 मध्ये पहिला टी20 विश्वचषक खेळणार आहे आणि हा त्याचा शेवटचा विश्वचषक देखील असू शकतो. चहल 33 वर्षांचा आहे. 2022 मध्ये चहलची विश्वचषकासाठी निवड केली होती. पण टीम काॅम्बिनेशन मुळे त्यास संघात स्थान मिळाले नव्हते. भारतीय संघात फिरकीपटूंमध्ये कडवी स्पर्धा आहे. हे ही तितकचं खरं आहे. त्यामुळे 2024 चा टी20 विश्वचषक युझवेंद्र चहलचा अखेरचा ठरु शकतो.
महत्ताच्या बातम्या-
टी20 विश्वचषकाआधीच सुर्यकुमार यादवनं केलं, यशस्वी जयस्वालला सावधान!
भारत-पाकिस्तान सामन्यावर दहशतवादी हल्ल्याची धमकी, आईएसआईएस (ISIS) कडून मिळाली धमकी
बाबर आझम मोडणार का कोहलीचा विक्रम? बाबरला आज सुवर्णसंधी, जाणून घ्या बातमीद्वारे