सोमवारी (1 मे) रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यात आमना सामना झाला. मागच्या सामन्यात आरीसीबीचे नेतृत्व करणारा विराट कोहली या सामन्यात फलंदाज म्हणून खेळला. विराटने या सामन्यात 30 चेंडूत अवघ्या 31 धावा केल्या आणि विकेट गमावली. रवी बिश्नोईच्या चेंडूवर विराटने यष्टीरक्षक निकोलस पूरन याच्या हातात विकेट गमावली. याचसोबत विराटच्या नावावर एका नकोश्या विक्रमाची नोंद देखील झाली.
इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएलमध्ये विराट कोहली नेहमीच आक्रमख खेळी करत आला आहे. या सामन्यात मात्र या सामन्यात विराटची बॅट शांत दिसली. त्याने अवघ्या 103.3च्या स्ट्राईक रेटने धावा केल्या. आयपीएल 2015 नंतर विराटची हा चौथा सर्वात कमी स्ट्राईक रेट ठरला. यापूर्वी आयपीएल 2022मध्ये विराट कोहलीने चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध अवघ्या 90.91च्या सरासरीने धावा केल्या होत्या, जो आयपीएलमधील त्याचा सर्वात कमी स्ट्रईक रेट होता.
आयपीएल 2015 नंतर विराट कोहलीचा सर्वात कमी स्ट्राईक रेट
33 चेंडूत 30 धावा विरुद्ध सीएसके – स्ट्राईक रेट 90.91 (2022)
33 चेंडूत 31 धावा विरुद्ध केकेआर – स्ट्राईक रेट 93.94 (2018)
34 चेंडूत 35 धावा विरुद्ध पंजाब किंग्ज – स्ट्राईक रेट 103.94 (2021)
31 off 30 चेंडूत 31 धावा विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स – स्ट्राईक रेट 103.33 (2023*)
दरम्यान, उभय संघांतील या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्सचा फिरकीपटू रवी बिश्नोई जबरदस्त फॉर्ममध्ये दिसला. बिश्नोईने विराट कोहलीपाठोपाठ ग्लेन मॅक्सवेल () याचीही विकेट घेतली. विराट कोहलीकडे या सामन्यात एक मोठा विक्रम नावावर करण्याची संधी होती. मात्र, 31 धावा करून विकेट गमावल्यामुळे त्याला हा विक्रम नावावर करता आला नाही. विराटच्या नावावर सध्या 6988 धावा आहेत. आपल्या 7000 आयपीएल धावा पूर्ण करण्यासाठी विराटला पुढच्या सामन्याचा वाट पाहावी लागणार आहे. पुढच्या सामन्यात विराटने 12 धावा केल्यानंतर तो आयपीएलमध्ये 70000 धावा करणारा पहिलाच फलंदाज ठरेल. (Virat Kohli’s poor performance against Lucknow, missed the opportunity to make a big record)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
दोन दिग्गज पहिल्यांदाच एकत्र! डब्ल्यूटीसी फायनलआधी पुजाराच्या नेतृत्वात खेळणार स्टीव स्मिथ
केदार जाधवचे आयपीएलमध्ये कमबॅक! ‘या’ संघासाठी खेळणार उर्वरित आयपीएल 2023