इंग्लंडमधील ऐतिहासीक लॉर्ड्स स्टेडियम सध्या चर्चेचा विषय ठरले आहे. येथे भारत विरूद्ध इंग्लंड यांच्यातील 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना खेळला जाणार आहे. मात्र, पहिल्या दिवशी खेळपट्टीचा जो फोटो दिसत आहे, तो चकीत करणारा आहे. संपुर्ण खेळपट्टीवर हिरवे गवत दिसून येत आहे. यामुळे वेगवान गोलंदाजांना या खेळपट्टीचा फायदा मिळू शकतो. इंग्लंड क्रिकेट बोर्डाने आगोदरच घोषित केले आहे की, ज्याप्रकारे भारताने त्यांच्या मायदेशी परिस्थितीचा फायदा घेत त्याच्या मनाप्रमाने खेळपट्टी बनवली होती, इंग्लंडदेखील तशाच मनस्थितीत आहे.
इंग्लंड संघ जेव्हा भारत दौऱ्यावर आला होता, त्यावेळी इंग्लंड क्रिकेट व्यवस्थापनाने खेळपट्टीवरुन अनेक प्रश्न विचारले होते. असे म्हटले गेले होते की, भारतीय संघाने त्यांच्या फिरकी गोलंदाजांना फायदा मिळण्यासाठी ही खेळपट्टी बनवली होती. इंग्लंडचे माजी खेळाडू मायकल वाॅनने त्यावेळी बीसीसीआयची खुप निंदा केली होती.
तो म्हणाला होता, ‘भारताने अशी खेळपट्टी बनवून इंग्लंडवर दबाव निर्माण केला. भारताला त्यांच्या खेळपट्टीवर खेळण्याची सवय आहे. खेळपट्टीशी छेडछाड करण्याचीही एक सीमा असायला पहिजे. मात्र, भारताने एकतर्फी खेळपट्टी बनवली. इंग्लंडलाही आता असे करण्याचा पुर्ण अधिकार असला पाहिजे. भारताचा संघ भविष्यात जेव्हा इंग्लंडला येईल तेव्हा त्यांनाही तेथे ग्रीन टाॅप बघायला मिळू शकतात.’
लॉर्ड्सची खेळपट्टी पाहिल्यानंतर वाटते की, इंग्लंड क्रिकेट बोर्ड याच मार्गावर चालत आहे. भारताचा विचार केला तर रोहित शर्मा, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे आणि कर्णधार विराट कोहली हे सर्व फलंदाज धावा बनवण्यासाठी झगडत आहेत. अशा परिस्थितीत लॉर्ड्सच्या खेळपट्टीवर खेळताना त्यांच्या अडचणीत वाढ होऊ शकते. खेळपट्टीचा इंग्लंड संघ पुरेपूर फायदा घेईल.
There’s your Lord’s pitch two days out. It’s 22 yards of grass. What do you want from me? pic.twitter.com/ji4zr7eTUM
— Elizabeth Ammon (@legsidelizzy) August 10, 2021
दरम्यान कसोटी मालिकेतील नॉटिंघम येथे झालेला पहिला सामना पावसामूळे अनिर्णीत राहिला होता. इंग्लंडचा संघ प्रथम फलंदाजीसाठी आला होता. बुमराहाने या सामन्यातील पहिल्या डावात 4 विकेट्स घेतल्या आणि इंग्लंड संघाला 183 धावांवर रोखले होते. पहिल्या डावात भारताच्या रविंद्र जडेजाने अर्धशतक आणि केएल राहुलने 86 धावा करुन भारताला 95 धावांची आघाडी मिळवून दिली होती.
प्रतिउत्तर देताना कर्णधार जो रुटच्या शतकाच्या मदतीने इंग्लंड संघाने भारतासमोर मोठे आव्हान उभे केले. चौथ्या दिवसाच्या शेवटीपर्यंत भारताने 1 विकेट गमावून 52 धावा केल्या होत्या. अखेर भारताला विजयासाठी 157 धावांची आवश्यकता होती. मात्र पाचव्या दिवशी पावसामूळे खेळ होऊ शकला नाही आणि सामना अनिर्णीत करावा लागला.
भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसरा कसोटी सामना 12 ऑगस्टपासून सुरू होणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
परदेशी लीगमध्ये भारतीय महिला अष्टपैलूचा कहर; २ विकेट्स चटकावल्यानंतर पाडला धावांचा पाऊस
चेन्नई पाठोपाठ मुंबईही ‘या’ दिवशी युएईला होणार रवाना, पहिल्याच सामन्यात असतील आमने सामने