इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेची प्रतिक्षा अखेर संपली आहे. उद्यापासून (९ एप्रिल) या टी२० क्रिकेटच्या उत्सवाला सुरुवात होणार आहे. या स्पर्धेतील पहिली लढत ५ वेळेस आयपीएलचे जेतेपद पटकवणाऱ्या मुंबई इंडियन्स आणि पहिल्या जेतेपदाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघात रंगणार आहे. या मोठ्या सामन्यासाठी दोन्ही ही संघ कसून सराव करत आहेत.
अशातच या सामन्यापूर्वी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाच्या फिरकीपटूचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. ज्यावर चाहते आपल्या मजेशीर प्रतिक्रिया नोंदवत आहेत.
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचा फिरकीपटू युजवेंद्र चहल हा नेहमीच आपल्या मजेशीर व्हिडिओमुळे चर्चेत असतो. तसेच तो नेहमीच आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर मजेशीर व्हिडिओ शेअर करत चाहत्यांचे मनोरंजन करत असतो. अशातच आयपीएलच्या पहिल्या सामन्यापूर्वी त्याने ६ फूट ८ इंच लांबीचा काइल जेमीसनसोबत एक व्हिडिओ शेअर केला आहे.
ज्यामध्ये तो डबल्यूडबल्यूईचा रेसलर अंडरटेकर बनला आहे. तो टीमच्या हॉटेलमध्ये जाताना अंडरटेकर सारखी एंट्री घेताना दिसून येत आहे. त्याच्या मागे काइल जेमीसन चालताना दिसून येत आहे.
https://www.instagram.com/p/CNZL-B7HRuC/
या व्हिडिओ वर चाहते मजेशीर प्रतिक्रिया देत आहेत. त्याची पत्नी धनश्री वर्मा हिने या व्हिडिओवर हसायची ईमोजी शेअर केली आहे . तसेच त्याचा संघ सहकारी हर्षल पटेल यांनीदेखील या पोस्टवर मजेशीर प्रतिक्रिया दिली आहे. त्याने युजवेंद्र चहलला कमी उंचीमुळे मोबाईल फोन म्हटले आहे तर काइल जेमीसनला मोबाईल टॉवर असे म्हटले आहे.
मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघात होणारा आयपीएल २०२१ हंगामाचा पहिला सामना चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर भारतीय प्रमाणवेळेनुसार ७.३० वाजता सुरु होणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
सलामीच्या सामन्यात मुंबई पलटणवर भारी पडणार बेंगलोरची बोल्ड आर्मी? पहा काय सांगतोय आतापर्यंतचा इतिहास
आरसीबी संघात सामील झाल्याने ग्लेन मॅक्सवेलचे ‘हे’ मोठे स्वप्न होणार पूर्ण