मुंबई । कोरोना व्हायरसमुळे जगभरातील सर्व क्रीडा स्पर्धा अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आले आहे. कोरोनाने संपूर्ण जगाची झोप उडवली असली तरी या कोरोनाच्या सावटात सर्वप्रथम फुटबॉल सामन्यांना सुरुवात झाली आहे. फुटबॉल पाठोपाठ क्रिकेटचे देखील पुनरागमन होता आहे. पुढील महिन्यात इंग्लंड आणि वेस्ट इंडिज यांच्यात कसोटी मालिका खेळणार आहे.
आता आशिया खंडात ही क्रिकेटचे पुनरागमन होत आहे. श्रीलंका येथे 29 जूनपासून टी20 लीगला सुरुवात होत आहे. या लीगमध्ये तिलकरत्ने दिलशान, दसून शनाका, अजंता मेंडीस हे दिग्गज खेळाडू खेळताना दिसून येणार आहेत.
श्रीलंका देशात कोरुनाचा जास्त प्रभाव नसल्याने ही लीग खेळवण्यासाठी श्रीलंका सरकारने परवानगी दिली आहे. 28 जून रोजी रविवारच्या दिवशी सरकारने येथील लॉक डाउन हटवले आहे.
ही स्पर्धा डबल राऊंड रॉबिन फॉर्मेटमध्ये खेळवण्यात येणार आहे. टॉपच्या संघाला अंतिम फेरीत खेळता येणार आहे.
दुसऱ्या आणि तिसर्या स्थानावर राहिलेल्या संघात एलिमिनेटर सामना खेळवण्यात येईल. या स्पर्धेचे प्रसारण पॅनकार्ड अॅप यू ट्यूब आणि फेसबुकवर होणार आहे.
संघ आणि खेळाडूंची नावे
मोनारगाला हॉर्नेट्स (Monaragala Hornets): तिलकरत्ने दिलशान (कर्णधार), अजीत एकानायके (यष्टिरक्षक), कसुन सेनानायके, बिनरू फर्नांडो, श्रियान विजेरत्ने, चेतन डी सिल्वा, ध्यान राणातुंगा, चमिंड सिल्वा, इमेष उदयंगा, चितुरंगा कुमारा, प्रदीप विथर्ना, निशान मेंडिस, उमेश करुणारत्ने, मार्क नवंजया, सचित्रा सेरसिंघे
उनिलायंस महियांगनया ( Unilions Mahiyanganaya): थिलन तुसारा (कर्णधार), हरेन सिल्वा, मनेला उदरवटे, अनुरुद्धा रायपक्षा, मलिंदा लोकुंदटिगे, कविदु गुणारत्ने (यष्टिरक्षक), सदनल एलवाल्गे, श्रियान चंडीमल, हसनजीत मुनावीरा, अमल अनापनु, बथय जयसूर्या, निसाल परेरा, गनुका हेराथ, नुवान पुष्पकुमारा, सुरंगा विक्रमसिंघे
बदुला सी ईगल्स (Badulla Sea Eagles): परवेज महरूफ (कर्णधार), शेहान राणातुंगा, निलंका जयवर्धने, प्रदीप समरवीरा, चतुरंगा दिसानायके, लहिरू उदेश, गायन लक्षण, नविंदा इमाल्का, समीरा थरंगा (यष्टिरक्षक), चनाका मेंडिस, रोहण पथिर्णा, निरोशन चतुरंगा, यशंता मधुसंका, विश्वा करुणारत्ने, दसुन शनाका
वेलावाया वाइपर्स (Wellawaya Vipers): अजंथा मेंडिस (कर्णधार), रशमिना केसारा, लहिरू मेदुवंथा, चथुरा मनरंगा, संदुन दुष्मंथा, चंदाना लकमल, अचिंथा इरांदा, अदित्या सिरिवर्धने (यष्टिरक्षक), अनिंथ बंडासा, अकिला दुष्यंथा, अमिला सेनदीरा, अमिला तुसारा, अंजना लक्षण, पवन इदिरिसिंघे, गयान चतुरंगे.
सामन्याचे वेळापत्रक
तारीख वेळ संघ
29 जून 11:00 मोनारगाला हॉर्नेट्स V/S वेलावाया वाइपर्स
29 जून 02:30 उनिलायंस महियांगनया V/S बदुला सी ईगल्स
30 जून 11:00 उनिलायंस महियांगनया V/S वेलावाया वाइपर्स
30 जून 02:30 मोनारगाला हॉर्नेट्स V/S बदुला सी ईगल्स
1 जुलै 11:00 मोनारगाला हॉर्नेट्स V/S उनिलायंस महियांगनया
1 जुलै 02:30 वेलावाया वाइपर्स V/S बदुला सी ईगल्स
2 जुलै 11:00 उनिलायंस महियांगनया V/S बदुला सी ईगल्स
2 जुलै 02:30 मोनारगाला हॉर्नेट्स V/S वेलावाया वाइपर्स
3 जुलै 11:00 मोनारगाला हॉर्नेट्स V/S बदुला सी ईगल्स
3 जुलै 02:30 उनिलायंस महियांगनया V/S वेलावाया वाइपर्स
4 जुलै 11:00 मोनारगाला हॉर्नेट्स V/S उनिलायंस महियांगनया
4 जुलै 02:30 वेलावाया वाइपर्स V/S बदुला सी ईगल्स
5 जुलै 11:00 एलिमिनेटर सेकंड पोजिशन V/S थर्ड पोजिशन
5 जुलै 02:30 अंतिम सानमा फर्स्ट पोजिशन टीम V/S एलिमिनेटर विजेता