दुबई। एशिया कप 2018 स्पर्धेत आज (21 सप्टेंबर) भारताचा बांगलादेश विरुद्ध सुपर फोरमधील पहिला सामना सुरु आहे. या सामन्यात भारताचा माजी कर्णधार एमएस धोनीच्या नेतृत्वाच्या अनुभवाचा भारतीय संघाला फायदा झाला आहे.
त्याने भारताचा प्रभारी कर्णधार रोहित शर्माला 9व्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूनंतर क्षेत्ररक्षणात एक बदल करायला सांगितला. ज्यामुळे बांगलादेशचा फॉर्ममध्ये असणारा शाकिब अल हसनला त्याची विकेट गमवावी लागली आहे.
यावेळी भारताकडून वनडेत एक वर्षानंतर पुनरागमन करणारा रविंद्र जडेजा गोलंदाजी करत होता. या षटकात जडेजाने 1 नो बॉल टाकला होता आणि त्यानंतर त्याला दोन चौकारही शाकिबने मारले होते. ही या सामन्यातील जडेजाची पहिली विकेट होती.
या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार भारतीय गोलंदाजांनीही चांगली कामगिरी करताना पहिल्या सहा षटकातच बांगलादेशच्या लिटॉन दास आणि नाझमुल हुसेन शान्तो या सलामीवीरांच्या विकेट गमावल्या होत्या.
त्यानंतर बांगलादेशला तिसरा धक्का भारताचा फिरकी गोलंदाज रविंद्र जडेजाने दिला. त्याने शाकिबला शिखर धवनकडे झेल देण्यास भाग पाडले. पण या विकेटचे जेवढे श्रेय जडेजा आणि शिखरचे आहे तेवढेच धोनीच्या मार्गदर्शनालाही आहे.
त्याने शाकिब बाद होण्याआधी रोहितला लेग साइडच्या क्षेत्ररक्षकाला स्केअर लेगला उभे करण्याचा सल्ला दिला होता. त्यानुसार शिखर स्केअर लेगला उभा राहिला. त्याचवेळी शाकिबने जडेजाने टाकलेल्या 9 व्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर स्विप शॉट मारला. पण तो चेंडू शिखरच्या हातात येऊन विसावला आणि शाकिब बाद झाला.
Reading batsman's brain from behind the stumps! Thala Mastermind! #WhistlePodu #INDvBAN 💛🦁 pic.twitter.com/2eK1ZBsKNf
— Chennai Super Kings (@ChennaiIPL) September 21, 2018
https://twitter.com/DRVcricket/status/1043114004233814017
यानंतर या सामन्यात जडेजाने त्याच्या 10 षटकात 29 धावा देत 4 विकेट्स घेतल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या:
–वाढदिवस विशेष: सिक्सर किंग ख्रिस गेलबद्दल माहित नसलेल्या १० गोष्टी
–किदांबी श्रीकांत बरोबरच सिंधूचीही चायना ओपनमध्ये निराशा
–वनडेत १० हजार धावा करणारा निवृत्त खेळाडू करतोय पुनरागमन!