Loading...

किदांबी श्रीकांत बरोबरच सिंधूचीही चायना ओपनमध्ये निराशा

भारतीय बॅटमिंटनपटू किदांबी श्रीकांत आणि पीव्ही सिंधू हे दोघेही चायना ओपनच्या एकेरीच्या उपांत्यपूर्व सामन्यात पराभूत झाले आहेत.

Loading...

श्रीकांत जपानचा वर्ल्ड चॅम्पियन केंटो मोमोटा विरुद्ध खेळताना 9-21, 11-21 तर सिंधू जागतिक क्रमवारीत सहाव्या क्रमांकावर असणाऱ्या चीनच्या चेन युफेइ विरुद्ध 11-21, 21-11,15-21 अशी पराभूत झाली.

याआधी सिंधू आणि चेन सहा वेळा आमने-सामने आले होते यापैकी चार सामन्यांत सिंधूच वरचढ होती. या सामन्याच्या पहिल्या सेटमध्ये चेन 6-3 अशी आघाडीवर होती. यावेळी तिने उत्तम खेळ करत सामना 11-5 असा करत तो सेट जिंकला. या सामन्यात सिंधूने भरपुर चुका केल्या याचा फायदा चेनने घेतला.

दुसऱ्या सेटमध्ये सिंधूने 6-1 अशी आघाडी घेतली होती पण चेनने उत्कृष्ठ शॉट खेळले तरीही हा सेट सिंधूने जिंकत 1-1 अशी बरोबरी साधली. शेवटच्या आणि महत्त्वाच्या सेटमध्ये सिंधूने तिची लय कायम राखत चार सलग गुण मिळवले होते पण चेनच्या माऱ्यापुढे तिला हार पत्करावी लागली.

Loading...

तसेच पुरुष एकेरीच्या उपांत्यपूर्व सामन्यात श्रींकातही पराभूत झाला. नुकतेच त्याला मोमोटा विरुद्ध जपान ओपनच्या उपांत्य सामन्यात देखील पराभव स्विकारावा लागला होता.

श्रीकांत आणि मोमोटाची समोरा-समोर येण्याची ही आठवी वेळ होती, याआधी त्याला फक्त तीन सामने जिंकता आले. तसेच त्याला मलेशिया ओपन आणि इंडोनेशिया ओपनमध्ये मोमोटा विरुद्ध पराभव स्विकारावा लागला होता.

चायना ओपनच्या पहिल्या सेटमध्ये 1-5 असे पिछाडीवर असताना श्रीकांतने सलग तीन गुण मिळवत सेट थोडा सावरण्याचा प्रयत्न केला. तरीही त्याला 19-6 असा पराभव स्विकारावा लागला.

Loading...

दुसऱ्या सेटमध्येही मोमोटाने 4-3 ते 13-3 अशी त्याची आघाडी कायम ठेवली.

महत्त्वाच्या बातम्या:

वनडेत १० हजार धावा करणारा निवृत्त खेळाडू करतोय पुनरागमन!

विराटला शुन्य तर बजरंगला ८० गुण, तरीही खेलरत्न विराटला कसा?

You might also like
Loading...