भारतीय क्रिकेट संघ सध्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी खेळण्यात व्यस्त आहे. मालिकेतील तिसऱ्या सामन्यानंतर रविचंद्रन अश्विनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला. अश्विन निवृत्तीची घोषणा करेल अशी कोणालाच अपेक्षा नव्हती. पण चाहत्यांना आणखी एक मोठा धक्का लागू शकतो. खरंतर, इंग्लंडविरुद्धच्या पुढील कसोटी मालिकेपूर्वी टीम इंडियाच्या कसोटी संघात आणखी अनेक मोठे बदल पाहायला मिळू शकतात.
भारतीय कसोटी संघात असे अनेक खेळाडू आहेत जे सतत खेळत आहेत. मात्र असे असूनही त्याची कामगिरी काही विशेष झाली नाही. अशा परिस्थितीत, कदाचित आगामी काळात या फॉरमॅटला अन्य कोणी खेळाडूही अलविदा म्हणणार असतील. तर चाहत्यांना त्यासाठी तयार राहावे लागेल. मीडिया रिपोर्ट्सनुसार, इंग्लंडविरुद्धच्या पुढील कसोटी मालिकेपूर्वी भारताच्या कसोटी संघात मोठे बदल अपेक्षित आहेत. रविचंद्रन अश्विनची निवृत्तीची घोषणा ही त्याची सुरुवात मानली जात आहे.
अश्विनची कारकीर्द चांगली चालली होती आणि त्याला कसोटी संघात सातत्यपूर्ण संधी मिळत होत्या आणि त्याने आणखी खेळायला हवे होते असे अनेक माजी क्रिकेटपटूंचे मत होते. अश्विनच्या मनात मात्र वेगळंच काही चाललं होतं. अश्विननंतर कसोटी संघात कोणता खेळाडू स्थान मिळवतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
येत्या 3 ते 7 जानेवारी दरम्यान खेळल्या जाणाऱ्या सामन्याने बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीचा समारोप होणार असल्याची माहिती आहे. या मालिकेत आतापर्यंत तीन सामने खेळले गेले आहेत. दोन्ही संघांनी 1-1 असा सामना जिंकला आहे. आता या मालिकेतील पुढचा सामना मेलबर्नमध्ये खेळवला जाणार आहे. जो 26 डिसेंबरपासून सुरू होणार आहे. इंग्लंडच्या भारत दौऱ्याची सुरुवात 22 जानेवारीपासून होणाऱ्या पाच सामन्यांच्या टी20 मालिकेने होणार आहे. यानंतर दोन्ही संघ तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत आमनेसामने येतील.
त्यानंतर भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिकाही होणार आहे. भारतीय संघ इंग्लंडविरुद्ध त्याच्या भूमीवर पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. त्यातील पहिला सामना 20 जूनपासून लीड्स येथे खेळवला जाईल.
हेही वाचा-
अश्विन ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाण्यास तयार नव्हता, कारण जो पर्यंत…., टीम मॅनेजमेंट समोर ठेवला होता ‘हा’अट
भारताचा WTC फायनलचा मार्ग खडतर, पाहा अंतिम फेरीसाठी टीम इंडियाला काय करावं लागेल?
या वर्ल्ड रेकाॅर्डवर स्मृती मानधनाच्या नजरा, वेस्ट इंडिजविरुद्धच्या निर्णायक सामन्यात इतिहास रचणार