जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा 2023च्या अंतिम सामन्यात पहिल्या दिवशी ट्रेविस हेड आणि स्टीव्ह स्मिथ यांनी केलेल्या टिच्चून फलंदाजीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने पहिल्या दिवशी वर्चस्व गाजवले. त्यानंतर दुसऱ्या दिवशीही गुरुवारी (दि. 08 जून) सर्व विकेट्स गमावत 469 धावा चोपल्या. ऑस्ट्रेलियाकडून ट्रेविस हेड याने 163 आणि स्टीव्ह स्मिथ याने 121 धावांची शतकी खेळी साकारली. तसेच, भारताकडून मोहम्मद सिराज याने सर्वाधिक 4, तर मोहम्मद शमी आणि शार्दुल ठाकूर यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या.
ऑस्ट्रेलियाचा डाव संपल्यानंतर रोहित शर्मा आणि शुबमन गिल (Rohit Sharma And Shubman Gill) यांनी भारताकडून डावाची सुरुवात केली. मात्र, हे दोघेही फलंदाज अवघ्या 30 धावांच्या आत तंबूत परतला. रोहित शर्मा (Rohit Sharma) याच्याकडून संघाला मोठ्या खेळीची अपेक्षा होती, पण त्याने चाहत्यांना निराश केले आणि ऑसी कर्णधार पॅट कमिन्स (Pat Cummins) याच्या सहाव्या षटकातील अखेरच्या चेंडूवर आपली विकेट गमावली.
खरं तर, रोहितने वेगाने आत येणाऱ्या चेंडूवर फटका मारण्याचा प्रयत्न केला, पण चेंडू थेट पॅड्सवर लागला. रोहित क्रीझमध्ये अडकला, ज्यामुळे चेंडूला वेगाच्या मार्फत आत येण्याची पूर्ण संधी मिळाली. चेंडू पॅडवर लागताच कमिन्सने अपील केली आणि पंचांनी बोट वर केले. रोहितलाही पंचांच्या या निर्णयावर विश्वास होता, ज्यामुळे त्याने रिव्ह्यूची मागणी केली नाही.
https://www.instagram.com/reel/CtO2SBevaNo/?utm_source=ig_embed&utm_campaign=loading
रोहित यावेळी 26 चेंडूत 2 चौकारांच्या मदतीने 15 धावा करून तंबूत परतला. अशाप्रकारे एका कर्णधाराने दुसऱ्या कर्णधाराला तंबूचा रस्ता दाखवला. रोहितनंतर शुबमन गिल (Shubman Gill) हादेखील तंबूत परतला. गिलला स्कॉट बोलँड (Scott Boland) याने तंबूचा रस्ता दाखवला.
सलमीवीर जोडी बाद झाल्यानंतर आता सोशल मीडियावर रोहित आणि गिल जोरदार ट्रोल होत आहेत. शुबमन गिल याने आयपीएलमध्ये शानदार कामगिरी केली होती. त्यामुळे चाहत्यांना त्याच्याकडून खूप अपेक्षा होती. आयपीएलमध्ये त्याने 2 शानदार शतके झळकावली होती आणि हंगामातील सर्वाधिक 890 धावा करण्याचा विक्रमही आपल्या नावावर केला होता. (aus skipper pat cummins strikes early and dismisses rohit sharma in 6th over)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
अर्रर्र! गिल भाऊंचा अंदाज चुकला अन् बोलँडच्या भेदक चेंडूने केल्या दांड्या गुल, व्हिडिओ पाहाच
WTC Final मधील सर्वात भारी क्षण, भज्जीने दिला पाकिस्तानच्या चिमुकल्या चाहत्याला ऑटोग्राफ; Video Viral