नवी दिल्ली। भारतीय संघाच्या वेगवान गोलंदाजीचे नेतृत्व सध्या जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी आणि इशांत शर्मा करत आहेत. त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे भारतीय संघाने आतापर्यंत कसोटी क्रिकेटमध्ये दबदबा कायम राखला आहे.
उमेश यादव (Umesh Yadav) आणि भुवनेश्वर कुमार (Bhuvneshwar Kumar) यांच्याबरोबरच बुमराह, शमी आणि इशांतने दीर्घ काळापासून फलंदाजांवर आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे. त्याचबरोबर जगभरातील उत्कृष्ट क्रिकेटपटूंकडून प्रशंसा मिळविली आहे. प्रशंसा करणाऱ्यांच्या या यादीत आता ग्रॅमी स्वान हे नवीन नाव जोडले गेले आहे.
इंग्लंडचे माजी फिरकीपटू ग्रॅमी स्वान (Graeme Swann) यांनी भारतीय संघाच्या वेगवान गोलंदाजांच्या अविश्वसनीय कामगिरीसाठी त्यांची प्रशंसा केली आहे.
स्वान यांनी मागील वर्षी सप्टेंबरमध्ये वेस्ट इंडिज दौऱ्यादरम्यान भारतीय गोलंदाजी आक्रमण पाहिले होते. सोनी टेनच्या ‘पीट स्टॉप’ या चॅट शोमध्ये चर्चा करताना स्वान यांनी भारतीय गोलंदाजीचे मुल्यांकन करत म्हटले की, कोणत्याही संघाला स्वस्तात बाद करण्याची क्षमता भारतीय संघाच्या गोलंदाजांमध्ये आहे.
“ही वेगवान गोलंदाजी फळी ज्या पद्धतीने गोलंदाजी करत आहेत, त्यामुळे सध्याचा भारतीय संघ जगातील कोणत्याही संघाला स्वस्तात बाद करतील. या गोष्टीला मी अविश्वसनीय मानतो,” असे भारतीय गोलंदाजांची प्रशंसा करताना स्वान म्हणाले.
भारतीय वेगवान गोलंदाजांनी मागील वर्षी वेस्ट इंडिज दौऱ्यात २ सामन्यांच्या कसोटी मालिकेत ४० पैकी ३९ विकेट्स घेतल्या होत्या. त्याचबरोबर वेस्ट इंडिजवर २-०ने विजय मिळवून देण्यात महत्त्वपूर्ण भूमिका निभावली होती.
त्यावेळी स्वानदेखील वेस्ट इंडिजमध्येच होते. ते म्हणाले, “इंग्लंड संघ ऍशेस मालिका खेळत होता. मी ते पाहिलं नाही. आम्ही तेथेच होतो आणि तिथे भारतीय संघही होता. भारतीय गोलंदाजांनी उत्कृष्ट कामगिरी केली होती. बुमराहने (Jasprit Bumrah) त्या मालिकेत असाधारण भूमिका बजावली होती.”
ट्रेंडिंग घडामोडी-
-एकेवेळी वाद झालेल्या मिताली राजबद्दल बोलताना हरमनप्रीत म्हणते; मिताली ताई तर माझ्यासाठी…
-५६ वर्षांत जे घडलं नाही, आज ते स्टोक्सने भर लाॅकडाऊनमध्ये घडवलं