भारत विरूद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) संघातील 3 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला कसोटी सामना बेंगळुरूच्या मैदानावर खेळला गेला. या सामन्यात न्यूझीलंडने भारताचा 8 गडी राखून पराभव केला. भारताच्या मैदानावर सुमारे 7 दशकातील न्यूझीलंडचा हा तिसरा विजय आहे. न्यूझीलंडने येथे शेवटचा विजय 1988 मध्ये मिळवला होता. तत्पूर्वी दुखापत होऊनही भारतासाठी 99 धावांची शानदार खेळी केलेल्या रिषभ पंतनं (Rishabh Pant) पराभवानंतर मोठी प्रतिक्रिया दिली आहे.
सामन्याबद्दल बोलायचं झालं, तर न्यूझीलंडने पहिल्या डावात भारताला 46 धावात गुंडाळून सामन्यावरील पकड मजबूत केली होती. यानंतर त्यांनी पहिल्या डावात 402 धावा करून 356 धावांची आघाडी घेतली. भारताने या सामन्यात 462 धावा करत पुनरागमन केले, मात्र त्यांना 106 धावांचीच आघाडी घेता आली. अशाप्रकारे न्यूझीलंडला 107 धावांचे लक्ष्य मिळाले आणि त्यांनी अतिशय सहजरित्या लक्ष्याचा पाठलाग करत शानदार विजय मिळवत मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली.
न्यूझीलंडविरुद्धच्या पराभवानंतर भारताचा यष्टीरक्षक-फलंदाज रिषभ पंतने (Rishabh Pant) सोशल मीडियावर आपल्या भावना शेअर केल्या आहेत. तो म्हणाला, “हा खेळ नेहमीच तुमची परीक्षा घेतो. तुम्हाला खाली पाडेल, तुम्हाला उचलून पुन्हा खाली ढकलेल. पण ज्यांना ते आवडते ते प्रत्येक वेळी मजबूत होतात. तुमच्या प्रेम, समर्थन आणि उत्साहाबद्दल बंगळुरूच्या लोकांचे आभार. आम्ही जोरदार पुनरागमन करू.”
This game will test your limits, knock you down, lift you up and throw you back again. But those who love it rise stronger every time. Thanks to the amazing Bengaluru crowd for the love, support and cheers. We will be back stronger. ????#RP17 pic.twitter.com/W1askZtoGr
— Rishabh Pant (@RishabhPant17) October 20, 2024
महत्त्वाच्या बातम्या-
टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा स्टंपिंग करणारे टाॅप-5 यष्टीरक्षक
वनडेमध्ये सर्वाधिक वेळा RUN-OUT होणारे टाॅप-5 खेळाडू
पहिल्या कसोटीतील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल! या दमदार खेळाडूची संघात एन्ट्री






