---Advertisement---

IND vs NZ: बुमराहचा कहर, पहिल्याच चेंडूवर स्टंप उडवले; VIDEO पाहा!

On: रविवार, जानेवारी 25, 2026 8:20 PM
---Advertisement---

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पाच सामन्यांच्या टी20 मालिकेतील तिसरा सामना गुवाहाटीच्या बरसापारा क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जात आहे. या सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार सूर्यकुमार यादव याने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयानंतर भारतीय संघात मोठा बदल पाहायला मिळाला आणि दुसऱ्या टी20मधून विश्रांती देण्यात आलेल्या जसप्रीत बुमराहची दमदार एंट्री झाली.

सामन्याच्या सुरुवातीपासूनच बुमराहकडे सर्वांचे लक्ष लागले होते. तिसऱ्या टी20 सामन्यात त्याला डावाचा सहावा षटक टाकण्याची संधी मिळाली. बुमराहने आपल्या पहिल्याच षटकातील पहिला चेंडू थोडासा फुल आणि ऑफ स्टंपकडे आत येणारा टाकला. या चेंडूचा सामना करणारा न्यूझीलंडचा सलामीवीर टिम सायफर्ट पूर्णपणे गोंधळला. चेंडूची लाईन न समजल्याने त्याचा बॅट हवेतच राहिला आणि चेंडू थेट ऑफ स्टंप उडवत आत शिरला. पहिल्याच चेंडूवर विकेट घेत बुमराहने स्टेडियममध्ये एकच जल्लोष निर्माण केला.

बोल्ड झाल्यानंतर सायफर्टही क्षणभर अवाक झाला, तर बुमराहचा जल्लोष पाहण्यासारखा होता. दुसऱ्या सामन्यात त्याला विश्रांती देण्याच्या निर्णयावर टीका झाली होती, पण या सामन्यात बुमराहने टीकाकारांना चोख उत्तर दिले.

या मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांमध्ये फलंदाजांचा दबदबा पाहायला मिळाला होता. मात्र तिसऱ्या टी20 सामन्यातील खेळपट्टीवर गोलंदाजांनी वर्चस्व गाजवले. प्रथम फलंदाजीस उतरलेल्या न्यूझीलंड संघाला पहिल्या 6 षटकांत फक्त 36 धावा करता आल्या आणि त्यांनी तीन महत्त्वाचे विकेट गमावले.

या सामन्यासाठी टीम इंडिया दोन बदलांसह मैदानात उतरली. जसप्रीत बुमराहसह रवि बिश्नोईलाही अंतिम अकरामध्ये संधी देण्यात आली. सुरुवातीच्या षटकांतच न्यूझीलंडला दबावाखाली आणण्यात भारतीय गोलंदाज यशस्वी ठरले, त्यामुळे सामना अधिकच रंगतदार बनला आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---