मुंबई उपनगर कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने क्रांती क्रीडा महोत्सवयामध्ये जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत महिला गटात संघर्ष क्रीडा मंडळ, पुरुष द्वितीय श्रेणीत नवतरुण क्रीडा मंडळ तर प्रथम श्रेणी पुरुष स्वस्तिक क्रीडा मंडळ, आणि किशोर गटात यंग स्पोर्ट्स क्लब संघानी विजेतेपद पटकावले.
महिला गटात संघर्ष क्रीडा मंडळ विरुद्ध महात्मा गांधी स्पोर्ट्स क्लब यादोन बलाढ्य संघात अंतिम लढत झाली. संघर्ष क्रीडा मंडळाने ३६-१८असा विजय मिळवत विजेतेपद पटकावले. अंतिम विजेत्या संघर्ष क्रीडा मंडळाला रोख ७,०००/- व चषक तर अंतिम उपविजेत्या महात्मा गांधी संघाला रोख ५,०००/- देऊन गौरविण्यात आले.
द्वितीय श्रेणी पुरुष गटाच्या अंतिम सामन्यात जाखमाता क्रीडा मंडळा विरुद्ध नवतरुण क्रीडा मंडळाने ३३-३१ अशी बाजी मारली. विजत्या संघास रोख १५,०००/- व चषक तर उपविजेत्या संघास रोख १०,०००/- व चषक देऊन गौरविण्यात आले. किशोर गटात यंग स्पोर्टस संघाने ३५-२३ असा संकल्प क्रीडा मंडळावर विजय मिळवत रोख ३,०००/- व चषक पटकावला. तर उपविजेत्या संकल्प क्रीडा मंडळाला रोख २,०००/- व चषक देऊन गौरविण्यात आले.
प्रथम श्रेणी पुरुष गटात स्वस्तिक क्रीडा मंडळाने सत्यम क्रीडा मंडळावर ३३-१८ असा विजय मिळवत विजेतेपद पटकावले. स्वस्तिक मंडळाने विजेतेपदासह क्रीडा क्रीडा महोसत्वाच्या विजेतेपदाची हट्रिक साधली. स्वस्तिक संघाला रोख १५,०००/- व चषक तर सत्यम संघाला १०,०००/- रोख रक्कम व चषक देऊन गौरविण्यात आले.
महिला विभाग वैयक्तिक बक्षिसे:-
उत्कृष्ट चढाईपटू – सायली जाधव ( महात्मा ) चषक व रोख रक्कम १०००/-
उत्कृष्ट पक्कडपटू – साक्षी माने ( महात्मा ) चषक व रोख रक्कम १०००/-
उत्कृष्ट खेळाडु – भक्ती इंदुलकर ( संघर्ष ) चषक व रोख रक्कम २०००/-
व्दितीय श्रेणी पुरुष गट वैयक्तिक बक्षिसे:-
उत्कृष्ट चढाईपटू – प्रथमेश भायदे( जाखमाता ) -चषक व रोख रक्कम १०००/-
उत्कृष्ट पक्कडपटू – उद्देश नाक्ती – ( जाखमाता ) – चषक व रोख रक्कम १०००/-
उत्कृष्ट खेळाडू – स्वप्नील जगताप – (नवतरुण) – चषक व रोख रक्कम २०००/-
प्रथम श्रेणी पुरुष गट वैयक्तिक बक्षिसे:-
उत्कृष्ट चढाईपटू -आकाश रूडेल ( स्वस्तिक ) -चषक व रोख रक्कम १०००/-
उत्कृष्ट पक्कडपटू – अलंकार पाटील ( स्वस्तिक ) – चषक व रोख रक्कम १०००/–
उत्कृष्ट खेळाडू – आशिष मोहिते ( सत्यम ) – चषक व रोख रक्कम २०००/-
किशोर गट वैयक्तिक बक्षिसे:-
उत्कृष्ट चढाई – ऋषभ हटकर ( संकल्प ) -चषक व रोख रक्कम ५००/-
उत्कृष्ट पक्कड – राहुल गौड ( यंग ) चषक व रोख रक्कम ५००/-
उत्कृष्ट खेळाडू – प्रतीक ढाले ( यंग ) – चषक व रोख रक्कम १०००/-
क्रांती क्रीडा मंडळाचा ६० वर्षातील ४५ वा कबड्डी क्रीडा महोत्सव, प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद, मातीतील स्पर्धेला प्रो कबड्डीचा लूक, आकर्षक पारितोषिके, नामवंत खेळाडूंचा सहभाग व कबबडीतील मातबर प्रतिष्टीत व्यक्तीची उपस्थति या मुळे कबड्डी स्पर्धेने उपनगरात एक वेगळीच छाप पडली आहे, क्रांती क्रीडा मंडळाचे अध्यक्ष श्री प्रमोद घाग याच्या अध्यक्षते खाली श्री रमेश प्रभू, श्री प्रविण गावडे, श्री संजय संकपाळ, श्री अजय भोसले , श्री मंगेश लाड , श्री संजय पाडावे आणि सर्व पदाधिकारी व सभासद यांनी अहोरात्र मेहनत घेऊन स्पर्धा यशस्वी रित्या पार पडली.