मेलबर्न| ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉंटिंगने म्हटले आहे की राष्ट्रीय संघ व्यवस्थापनाने वनडे सामन्यात तिसर्या क्रमांकावर फलंदाजीसाठी एक आदर्श खेळाडू शोधण्याची गरज आहे. तो खेळाडू बराच काळ या क्रमांकावर खेळत राहावा. पुढील वनडे विश्वचषक 2023 मध्ये भारतात होणार आहे. या स्पर्धेपूर्वी ऑस्ट्रेलियाला त्यांच्या वनडे क्रिकेटपटुंवर काम करावे लागेल, असा विश्वास पॉंटिंगला आहे.
‘क्रिकेट डॉट कॉम डॉट एयू’ शी बोलताना पॉंटिंग म्हणाला , “तिसर्या क्रमांकावर बरीच वर्षे फलंदाजी करणारा खेळाडू शोधण्याची त्यांना(ऑस्ट्रेलियाला) गरज आहे. हे खुप महत्त्वाचे स्थान आहे. त्यांना या ठिकाणी बराच काळ खेळू शकेल असा एखाद्या खेळाडूचा शोध घ्यावा लागेल. हे खेळाडू मार्नस लाबूशेन किंवा स्टीव्ह स्मिथ असू शकतात.”
तो म्हणाला, “मग ते तिसर्या क्रमांकावर मार्नस आणि चौथ्या क्रमांकावर स्मिथ, किंवा स्मिथ तिसर्या स्थानावर असो किंवा चौथ्या क्रमांकावर लाबूशेन. वनडे क्रिकेटवर त्यांना काहीतरी काम करण्याची गरज आहे.”
नुकतीच ऑस्ट्रेलियाने इंग्लंडविरुद्ध टी20 मालिका 2-1 ने गमावली पण पॉंटिंगला खेळाच्या सर्वात छोट्या व मोठ्या स्वरूपाची (कसोटी) चिंता नाही.
पुढे बोलताना तो म्हणाला, “आम्हाला माहित आहे की ऑस्ट्रेलिया संघांचे टी20 क्रिकेट बर्याच दिवसांपासून चांगले राहिले आहे. त्यांचे कसोटी क्रिकेटही विलक्षण होते. त्यांच्या वनडे संघात काही कमतरता आहेत. पुढील एक आठवड्यात या उणीवा कमी होतील अशी आशा आहे.”
“इतक्या कमतरता नाहीत पण मला वाटते की त्यांनी यावर काम करण्याची गरज आहे कारण त्यांच्या प्रतिभेबद्दल शंका नाही.” असे पुढे बोलताना पॉंटिंगने सांगितले.
ऑस्ट्रेलियाचा संघ आता शुक्रवारपासून इंग्लंडविरुद्ध तीन सामन्यांची वनडे मालिका खेळणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
हिटमॅनला गोलंदाजीचे धडे देताना पाहिलंय का? पाहा व्हिडिओ
लाडकी लेक थांबलीय वडील धोनीचा स्केच घेऊन, सोशल मीडियावर व्हिडिओ होतोय जोरदार व्हायरल
खुशखबर: कोरोनावर मात करून ‘हा’ खेळाडू झाला सीएसकेच्या ताफ्यात दाखल
ट्रेंडिंग लेख –
आयपीएलच्या सर्व ८ संघांच्या सपोर्टिंग स्टाफची संपूर्ण माहिती, घ्या जाणून
दोन वेळा स्वप्न भंगल्यानंतर तिसऱ्या वेळी इंग्लंडला विश्वचषकाची भेट देणाऱ्या ‘आयरिश क्रिकेटरची’ गोष्ट
हे ५ खेळाडू आहेत आयपीएलच्या तेराव्या हंगामातील ऑरेंज कॅपचे प्रमुख दावेदार