सात वर्षांनंतर पुन्हा एकदा श्रीसंतला भारतीय चाहते मैदानावर धुमाकूळ घालताना बघणार आहेत. श्रीसंत हा सय्यद मुश्ताक अली या स्पर्धेतून पुनरागमन करणार आहे. त्यासाठी त्याने भरपूर तयारी केली आहे. 10 जानेवारी पासून सुरू होणार्या या टी-20 स्पर्धेत श्रीसंत केरळ संघाकडून सहभागी होणार आहे.
केरळच्या संभाव्य संघात श्रीसंतची निवड
सय्यद मुश्ताक अली टी-20 स्पर्धेत सहभागी होण्यासाठी केरळ संघाची संघ बांधणी सुरू झाली आहे. त्यानी आपला संभाव्य संघ जाहीर केला. ज्यामधे वेगवान गोलंदाज श्रीसंतला संधी मिळाली आहे. श्रीसंतला सय्यद मुश्ताक अली या स्पर्धेत सहभागी होण्या अगोदर केरळच्या संघाच्या सराव शिबिरात दाखल व्हावे लागणार आहे. त्याठिकाणी तो संजू सॅमसन आणि केरळच्या इतर खेळाडू सोबत सराव करावा लागणार आहे. कारण केरळ संघ या स्पर्धेसाठी चांगली तयारी करण्याचा प्रयत्न करत आहे. त्याचबरोबर श्रीसंतला या माध्यामातून पुनरागमन करण्याची खूप दिवसापासून प्रतिक्षा होती.
श्रीसंतने ही स्पर्धा संपल्यानंतर पुढील योजना काय असेल याचा खुलासा केला आहे. त्याने सय्यद मुश्ताक अली स्पर्धा संपल्यानंतर, त्याने पुन्हा एकदा भारतीय संघात खेळण्याची इच्छा व्यक्त केली आहे. तसेच 2023 मध्ये विश्वचषक स्पर्धा होणार आहे. अशात त्याची नजर या स्पर्धेवर आहे आणि ही स्पर्धा भारतात होणार आहे.
वयाच्या 37 व्या वर्षी क्रिकेटमध्ये पुनरागमन करणे अवघड
यापूर्वी श्रीसंतला शेवटचे खेळताना 2011 साली ऑगस्ट महिन्यात बघितले गेले होते. या व्यतिरिक्त त्याचे नाव 2013 साली प्रथम श्रेणी क्रिकेटच्या यादीत होते. वयाच्या 37 व्या वर्षी सूर गवसणी सोपी गोष्ट असणार नाही. परंतु मैदानावर टिकून राहण्यासाठी त्याला चांगल्या प्रकारे वापसी करण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतील.
श्रीसंतच्याबद्दल टाइम्स आॅफ इंडियाने लिहले आहे की, हे सत्य आहे की या वयात पुनरागमन करताना पुन्हा खेळण्याची संधी मिळू शकत नाही. मात्र वयाच्या 42 वर्षी सुद्धा लिएंडर पेस सारख्या खेळाडूनी शानदार स्लॅम जिंकला होता. या यादीत रॉजर फेडररच्या नावाचा सुद्धा समावेश आहे.
2023च्या विश्वचषक स्पर्धेत खेळण्याचे स्वप्न
आपल्या क्रिकेट कारकिर्दीबद्दल बोलतांना 37 वर्षीय श्रीसंतची म्हणणे आहे की, “त्याचे शेवटचे स्वप्नं आहे की, तो 2023 च्या विश्वचषक स्पर्धेत भारताकडून खेळावा, आणि पुन्हा एकदा चषक जिंकण्यात आपले योगदान देवून इतिहास रचावा.”
महेंद्र सिंग धोनीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने 2011 साली भारतीय संघाने विजेतेपद पटकावले होते, तेव्हा श्रीसंत भारतीय संघाचा भाग होता. मात्र स्पॉट फिक्सिंग प्रकरणात अडकल्यामुळे त्याच्यावर सात वर्षाची बंदी घालण्यात आली होती.
महत्वाची बातमी:
– IND vs AUS : रहाणे-जडेजाच्या शतकी भागीदारीच्या जोरावर दुसऱ्या दिवसाखेर भारतीय संघ ८२ धावांनी आघाडीवर
– NZ vs PAK : पहिल्या डावात न्यूझीलंडचा ४३१ धावांचा डोंगर, प्रत्युत्तरात पाकिस्तानची अडखळती सुरुवात
– मोठी बातमी! दशकातील सर्वोत्तम आयसीसी टी२० संघाचा एमएस धोनी कर्णधार, या तीन भारतीयांनाही मिळाले स्थान