यावर्षी खेळला जाणारा वनडे विश्वचषक भारतात पार पडणार आहे. भारतीय क्रिकेट नियमक मंडळ यासाठी पूर्ण तयारीत आहे. पण भारताचे शेजारी राष्ट्र बांगलादेशला वनडे विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर मोठा झटका बसला आहे. त्यांचा वेगवान गोलंदाज इबादत हुसैन दुखापतीमुळे वनडे विश्वचषकातही खेळू शकणार नाहीये. इबादतला अफगाणिस्तानविरुद्धच्या वनडे मालिकेदरम्यान गुडघ्याला दुखापत झाली होती.
माध्यमांतील वृत्तांनुसार इबादत हुसेन (Ebadot Hossain) दुखापतीमुळे आगामी आशिया चषकासह वनडे विश्वचषकात देखील खळणार नाहीये. क्रिकबझच्या माहितीनुसार बांगलादेशच्या मुख्य निवडकर्त्यांकडून याविषयी माहिती दिली. असे सांगितले गेले आहे की, “इबादत हुसेन विश्वचषकासाठी उपलब्द नसेल. हा बांगलादेश क्रिकेट संघासाठी मोठा झटका आहे. कारण त्याच्या गुडघ्याला शस्त्रक्रियेची गरज आहे. ऑपरेशननंतर त्याला नक्कीच रिहॅबची गरज असेल. यात किमान तीन-चार महिन्यांचा वेळ जाऊ शकतो. त्यामुळे विश्वचषकासाठी त्याचा विचार केला जाऊ शकत नाही.”
दरम्यान, अफगाणिस्तान आणि बांगलादेश यांच्यातील वनडे मालिका मागच्या महिन्यात पार पडली. याच दरम्यान इबादतच्या गुडघ्याला दुखापत झाली. आशिया चषकासाठीही तो बांगलादेशचा महत्वाचा खेळाडू होता. पण दुखापतीमुले या स्पर्धेतून देखील त्याला आपले नाव मागे घ्यावे लागले. आशिया चषकात इबादतच्या जागी तंजीम साकिब याला संधी दिली गेली आहे, ज्याने अद्याप आंतरराष्ट्रीय पदार्पणाची संधी दिली गेली नाहीये. अशात आशिया चषक आणि वनडे विश्वचषकात बांगलादेशपुढे गोलंदाजांचा प्रश्न उपस्थित होऊ शकतो.
इबादतच्या कारकिर्दीतावर एक नजर टाकली, तर त्याने तिन्ही क्रिकेट प्रकरांमध्ये बांगलादेशचे प्रतिनिधित्व केले आहे. मार्च 2019 मध्ये त्याने न्यूझीलंडविरुद्ध कसोटी पदार्पण केले होते. आतापर्यंत या प्रकरात त्याला 20, वनडे क्रिकेटमध्ये 12, तर टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 4 सामने खेळता आले आहेत. कसोटी प्रकारत त्याने 42, वनडेत 22, तकर टी-20 आंतरराष्ट्रीयमध्ये 7 विकेट्स घेतल्या आहेत. (A big blow to the Bangladesh team before the World Cup! Important bowler out for ‘so many’ months due to injury)
महत्वाच्या बातम्या –
विराटला आऊट करण्यासाठी ‘हे’ करा, दक्षिण आफ्रिकेच्या माजी गोलंदाजाने सांगितला उपाय
नेपाळकडून आशिया चषकात अप्रतिम पदार्पण! पाकिस्तानने स्वस्तात गमावल्या पहिल्या दोन विकेट्स