आशिया चषकाच्या तोंडावर भारतीय क्रिकेट संघाला मोठा झटका बसला आहे. यष्टीरक्षक फलंदाज केएल राहुल आशिया चषकातील पहिल्या दोन सामन्यांसाठी उपलब्ध नसणार आहे. मागच्या काही महिन्यांपासून राहुल दुखापतीचा सामना करत होता, ज्यातून तो अद्याप बरा झाल्याचे दिसत नाही. आशिया चषकानंतर ऑक्टोबर महिन्यात होणाऱ्या वनडे विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर भारतीय संघासाठी ही चिंता राहुलच्या फिटनेसमुळे वाढताना दिसत आहे.
केएल राहुल (KL Rahul) इंडियन प्रीमियर लीग 2023 (IPL 2023) मध्ये दुखापतग्रस्त झाला होता. लखनऊ सुपर जायंट्सचा (Lucknow Super Giants) कर्णधार आपल्या दुखापतीमुळे आयपीएल हंगाम अर्ध्यात असताना लीगमधून बाहेर पडला. मागच्या काही महिन्यांपासून त्याने बेंगलोरच्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत (NCA) फिटनेस मिळवण्यासाठी काम देखील केले आहे. असे असले तरी, राहुलला अद्याप पूर्ण फिटनेस मिळवता आली नाही, असेच दिसते. याच पार्श्वभूमीवर प्रशिक्षक राहुल द्रविड (Rahul Dravid) यांनी मंगळवारी (29 ऑगस्ट) राहुल आशिया चषकातील पहिल्या दोन सामन्यांसाठी उपलब्ध नसेल, हे स्पष्ट केले.
राहुल पूर्णपणे फिट नसतानाही त्याला आशिया चषक संघात घेतल्यामुळे निवडकर्ते आणि संघ व्यवस्थापनावर मोठ्या प्रमाणात टीक झाल्या होत्या. अशात पहिल्या दोन सामन्यांंनंतर तो कशा पद्धतीने पुनरागमन करतो हे पाहण्यासारखे असेल. राहुलच्या फिटनेसबाबत कुठलीच ठोस माहिती समोर आली नसल्यामुळे आशिया चषकात त्याच्या खेळण्याबाबत देखील संभ्रम निर्माण झाला आहे. आशिया चषकानंतर भारताला मायदेशात ऑस्ट्रेलियाविरुद्ध तीन सामन्यांची वनडे मालिका खेळायची आहे. त्याने 5 ऑक्टोबर रोजी मायदेशात वनडे विश्वचषकाची सुरुवात होईल.
राहुल विश्वचषापूर्वी संघात पुनरागमन करेल, अशी चाहत्यांना अपेक्षा आहेत. मात्र, त्याच्या फिटनेसबाबत खरी परिस्थितीती सध्या फक्त संघ व्यवस्थापनाकडेच आहे. अशात येत्या काही दिवसांमध्ये याबाबत असणारा संभ्रम दूर होऊ शकतो. माध्यमांतील वृत्तांनुसार 3 सप्टेंबर रोजी वनडे विश्वचषकासाठी भारतीय संघ घोषित होऊ शकतो.
दरम्यान, आशिया चषक 2023 चे यजमानपद पाकिस्तानकडे आहे. मात्र, स्पर्धेतील केवळ चार सामने पाकिस्तानमध्ये खेळवले जाणार आहेत. राहिलेले 9 सामने श्रीलंकेत होतील. भारतीय संघाच्या आग्रहामुळे स्पर्धा हायब्रिड मॉडेवर आयोजित केली गेली. भारताने 2008 नंतर पाकिस्तानमध्ये एकही मालिका खेळली नाहीये. अशात आशिया चषकासाठीही संघाला पाकिस्तानमध्ये न पाढवण्याचा निर्णय घेतला गेला. 2 सप्टेंबर रोजी भारत आशिया चषकातील आपला पहिला सामना पाकिस्तानसोबत खेळेल. (Will KL Rahul be excluded from the upcoming World Cup? The Indian team will be announced on ‘this’ date)
महत्वाच्या बातम्या –
भारताच्या सर्वात मोठ्या समस्येवर द्रविडने तोडले मौन; म्हणाला, ’18-20 महिन्यांपूर्वीही मी…’
देशप्रेमापोटी मेजर ध्यानचंद यांनी नाकारलेली चक्क हिटलरची ऑफर; वाचा त्यांच्याबद्दलच्या रोमांचक गोष्टी