पाकिस्तान क्रिकेट बोर्ड आणि संघ मागच्या काही महिन्यांमध्ये अस्थिर आहे. बोर्ड आणि संघात अनेक बदल होत आहेत. कधी बोर्डाचे अध्यक्ष पदलतात, तर कधी प्रमुख निवडकर्ते. आता पाकिस्तानमधून अजून एक मोठी बातमी समोर येत आहे. पाकिस्तानचा माजी कर्णधार मिस्बाह उल हक यांचा पुन्हा एकदा पाकिस्तान क्रिकेट बोर्डात महत्वाची जबाबदारी मिळू शकते.
मिस्बाह उल हक (Misbah Ul Huq) याला पाकिस्तान क्रिकेट बोर्डामध्ये एक महत्वाची जबाबदारी मिळाली आहे. पीसीबीचे अध्यक्ष जका अशरफ (Zaka Ashraf) यांनी मिस्बाह याला क्रिकेट कमेटीचा प्रमुख म्हणून निवडले आहे. त्याव्यतिरिक्त मिस्बाह जका अशरफ यांचे सल्लागार म्हणूनही भूमिका पार पाडतील. मिस्बाह काही दिवसांपूर्वीच जका अशरफ यांना भेटला होता आणि आता त्याच्या खांद्यावर ही नवी जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
दरम्यान, मिस्बाह उल हक यापूर्वी पाकिस्तान क्रिकेट संघाचा मुख्य प्रशिक्षक आणि प्रमुख निवडकर्ता राहिला आहे. या दोन्ही पदांवर एकाच वेळी त्याने कामकाज पाहिले. ही पहिलीच वेळ होती, जेव्हा एक व्यक्त पाकिस्तान संघाच्या मुख्य प्रशिक्षक आणि प्रमुख निवडकर्त्यांची जबाबदारी पार पाडत असेल. पण रमीज राजा यांनी पीसीबीचे अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर मिस्बाहने आपल्या पदाचा राजीनामा दिला होता.
माध्यमांतील वृत्तांनुसार पाकिस्तानचा माजी अष्टपैलू मोहम्मद हफीज (Mohammad Hafeez) पाकिस्तानच्या मुख्य प्रशिक्षकाची जबाबदारी स्वीकारू शकतो. हफीजचे नाव मागच्या काही दिवसांपासून मुख्य प्रशिक्षकपदासाठी सर्वाधिक चर्चेत आहे. सध्या पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यात कसोटी मालिका खेळली जात आहे. ही मालिका संपल्यानंतर मोहम्मद हफीज मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी स्वीकारेल, असे सांगितले जात आहे. जून महिन्यापासून संघ मुख्य प्रशिक्षकाविना सराव करत आहे आणि मालिका खेळत आहे. (A big change in Pakistan cricket! Misbah-ul-Haq’s re-entry into PCB)
महत्वाच्या बातम्या –
‘तो काहीकाळ गोलंदाजी आक्रमणात कायम असेल’, मुकेश कुमारवर झहीर प्रभावित
थेट पाच महिन्यांनी भारतीय संघ दिसणार व्हाईट जर्सीत! जाणून घ्या शेड्यूल