---Advertisement---

शोएब मलिकच्या सख्या बहिणीचा मोठा खुलासा, ‘त्याची खूप लफडी होती’

On: शनिवार, जानेवारी 20, 2024 7:34 PM
Sania Mirza Shoaib Malik Sana Javed
---Advertisement---

सानिया मिर्झा आणि शोएब मलिक हे क्रीडाजगतातील ‘पॉवर कपल’ मानले जात होते. पण शनिवारी (20 जानेवारी) अखेर दोघांनी आपले मार्ग वेगळे केले. शोएब मलिक याने पाकिस्तानी अभिनेत्री सना जावेद हिच्याशी लग्नगाठ बांधली. सोशल मीडियावर या दोघांच्या लग्नाचे फोटो व्हायरल होत आहेत. तर दुसरीकडे सानिया आणि शोएबने घटस्फोट घेतल्याचे सांगितले जात आहे. शोएबच्या लग्नाने माध्यमांमध्ये जोरदार चर्चा सुरू असतानाच आता त्याची बहिनीने मोठे विधान केले आहे.

सानिया मिर्झा आणि शोएब मलिक दोघे एप्रिल 2010 मध्ये लग्नबंधनात अडकले. मागच्या 13 वर्षांमध्ये दोघांनी एकमेकांची साथ सोडली नाही. 2018 साली त्यांचा मुलगा इजहान याचा जन्म झाला. पण अवघ्या पाच वर्षांच्या इजहानला त्याच्या आई आणि वडिलांचा घटस्फोट पाहावा लागत आहे. शोएब मलिकेने शनिवारी (20 जानेवारी) पहिले किंवा दुसरे नाही, तर तिसरे लग्न केले. त्याची नवीन नवरी सना जावेद हिचेही हे पहिले नाहीतर दुसरे लग्न आहे. माध्यमांतील वृत्तांनुसार शोएब आणि सानिया एकमांच्या सहमतीने वेगळे झाले आहेत. पण पाकिस्तानच्या माजी कर्णधाराने शनिवारी तिसरे लग्न केल्यानंतर भारताती प्रचंड नाराजी दिसत आहे.

इतकेच नाही, चाहत्यांप्रमाणे शोएबला लग्नासाठी त्याच्या घरच्यांचा देखील पाठिंबा मिळाला नाहीये. माध्यमांतील वृत्तांनुसार शोएब आणि सनाच्या लग्नासाठी मलिक कुटुंबातील एकही व्यक्ती उपस्थित नव्हती. द पाकिस्तान डेलीच्या माहितीनुसार शोएब मलिकच्या बहिणीने सानिया मिर्झाबाबत चिंता व्यक्त केली. माहितीनुसार माजी भारतीय टेनिसपटू शोएबच्या विवाहबाह्या संबंधांमुळे निराश होती. शोएबच्या या वागण्यामुळे सानियान कंटाळली होती, असे स्वतः शोएब मलिकच्या बहिणीचे विधान समोर आले आहे.

दरम्यान, शोएब आणि सानिया वेगळे झाल्याचे शनिवारी अखेर स्पष्ट झाले. असे असले तरी, दोघांमधील हा वाद मागच्या दोन वर्षांपासून सुरू आहे. एका वर्षापासून शोएब आणि सानिया वेगळे राहत असल्याचे बातम्यांमधून समोर आले आहे. सोशल मीडियावर मागच्या मोठ्या काळापासून दोघांचा एकही सोबतचा फोटो पोस्ट झाला नाहीये. (A big revelation came from the sister of Shoaib Milak who got divorced with Sania Mirza)

महत्वाच्या बातम्या – 
मलिकच्या बायकोने व्हॅनिटी व्हॅनमध्ये केले होते असे काही कांड, ज्याची चर्चा आजही….
कोण आहे शोएब मलिकची तिसरी पत्नी सना जावेद, जिच्यासाठी पाकिस्तानी क्रिकेटरने सानिया मिर्झाला सोडले

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---