---Advertisement---

‘या’ गोलंदाजाने चक्क खेळपट्टी बाहेर फेकला चेंडू आणि मैदानावर उसळला हशा! बघा मजेशीर व्हिडिओ

On: बुधवार, डिसेंबर 30, 2020 11:17 PM
---Advertisement---

ऑस्ट्रेलियामध्ये सुरू असलेली बिग बॅश लीग स्पर्धा कायम कोणत्यातरी कारणासाठी चर्चेत असते. मग ते उत्तम क्रिकेट असो वा खराब अंपायरिंग. नुकताच या स्पर्धेमध्ये एक मजेशीर प्रसंग घडला असून, गोलंदाजाने चेंडू चक्क खेळपट्टी बाहेरच फेकला आहे.

नुकत्याच पार पडलेल्या ब्रिसबन हिट आणि होबार्ट हरिकेन्स मधील सामन्यात होबार्ट हरिकेन्स प्रथम फलंदाजी करत होते. होबार्टच्या डावातील सतराव्या षटकात लुईस जॉर्जी हा गोलंदाजी करण्यासाठी आला होता. आपल्या षटकातील शेवटचा चेंडू टाकताना जॉर्जीचा पाय सरकला व त्याने टाकलेला चेंडू थेट खेळपट्टी बाहेरच पडला. या वेळी मैदानात मोठ्या प्रमाणात हशा पिकली होती. जॉर्जी देखील काही प्रमाणात हास्य करत होता. मात्र त्याचे हे हास्य फार काळ टिकले नाही, कारण खेळपट्टी बाहेर चेंडू पडल्याने तो नोबॉल देण्यात आला व पुढील फ्री-हीट चेंडूवर फलंदाज टीम डेविडने खणखणीत षटकार ठोकला.

या मजेशीर प्रसंगाचा व्हिडिओ बिग बॅश लीगने आपल्या ऑफिशियल ट्विटर अकाऊंटवरून शेअर केला, व त्यानंतर अवघ्या काही मिनिटातच हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात वायरल झाला आहे.

https://twitter.com/BBL/status/1344217730044444673

दरम्यान सामन्याचा विचार केला असता, शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या सामन्यात होबार्ट हरिकेन्सने ब्रिसबन हिटचा १ धावेने पराभव केला. सामना जरी हरिकेन्सने जिंकला असला तरी, ब्रिसबनचा फिरकीपटू मुजीब उर रहमानला आपल्या उत्तम गोलंदाजीसाठी सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला आहे. मुजीबने ४ षटकांत केवळ १५ धावा देत तब्बल ५ फलंदाजांना बाद केले. आगामी सामन्यातही ब्रिसबनला मुजिबकडून अशाच उत्तम कामगिरीची अपेक्षा असणार आहे.

महत्वाच्या बातम्या:
– डेविड वॉर्नरचे पुनरागमन! असा आहे भारताविरुद्ध तिसऱ्या कसोटीसाठी ऑस्ट्रेलिया संघ
– अटीतटीच्या बॉक्सिंग डे कसोटीत न्यूझीलंडचा पाकिस्तानवर दणदणीत विजय
– काश्मीरमधील लोकांवर अत्याचार होतोय, पाकिस्तानचा माजी खेळाडू शाहिद आफ्रिदीचे वादग्रस्त विधान

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---