भारतीय संघाचा अनुभवी यष्टीरक्षक फलंदाज संजू सॅमसन विश्वचषक संघाचा भाग नाहीये. पण काही दिवसांपूर्वी सुरू झालेल्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये सॅमसन केरळ संघाचा कर्णधार म्हणून खेळत आहे. शनिवारी (21 ऑक्टोबर) सॅमसनने चंदीगड संघाविरुद्ध झंजावाती खेळी केली. त्याच्या अर्धशतकाच्या मदतीने केरळ संघाने या सामन्यात 193 धावांपर्यंत मजल मारली.
सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेत शनिवारी केरळा आणि चंदीगड संघ आमने सामने आले. मुंबईच्या डी वाय पाटील स्टेडियमवर हा सामना खेळला गेला. केरळणे नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. निर्धारीत 20 षटकांमध्ये त्यांनी 4 विकेट्सच्या नुकसानावर 193 धावा केल्या. कर्णधार संजू सॅमसन (Sanju Samson) याने अवघ्या 32 चेंडूत 52 धावांची खेळी केली. यात 4 चौकार आणि 3 षटकारांचा समावेश होता.
उभय संघांतील या सामन्यात केरळसाठी विशू विनोद याने 23 चेंडूत 42, तर वरून नायानार याने 27 चेंडूत 47 धावा केल्या. सलामीवीर रोहन कुन्नुमल यानेही 24 चेंडूत 30 धावा केल्या. दुसरीकडे चंदीगडसाठी आकाश सुदान याने 2, तर राज बावा आणि मुरुगन अश्विन यांनी प्रत्येकी एक-एक विकेट घेतली.
दरम्यान, सॅमसन याचे नाव विश्वचषक 2023 संघात सामील होण्याची चाहत्यांना अपेक्षा होती. मात्र, संघ व्यवस्थापन आणि निवडकर्त्यांनी त्याला विश्वचषकासाठी संधी दिली नाही. निवडकर्त्यांच्या या निर्णयानंतर चाहत्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजीही पाहायला मिळाली. असे असले तरी, सॅमसनच्या जागी विश्वचषक संघात स्थान मिळवणारा ईशान किशन देखील कुठेच कमी पडला नाही. विश्वचषकाआधी ईशाने वेस्ट इंडीज दौऱ्यात आपली गुणवत्ता सिद्ध केली होती. वनडे क्रिकेटमधील त्याचे एकंदरीत प्रदर्शन पाहून विश्वचषक संघात संधी दिली गेली. विश्वचषकातील पहिल्या सामन्यात त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकही धाव केली नाही. मात्र, इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात 47 धावांची खेळी केली. (A Brilliant knock from kerala’s captain Sanju Samson in Syed Mushtaq Ali Trophy 2023)
महत्वाच्या बातम्या –
‘मी पाकिस्तान झिंदाबाद बोलणार…’, बंगळुरूत पोलीस अन् चाहत्यामध्ये राडा- व्हिडिओ तुफान व्हायरल
वानखेडेत ENG vs SA महामुकाबला! Toss जिंकत बटलरचा बॉलिंगचा निर्णय; एक दिग्गज In, तर दुसरा Out