वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेत शनिवारी (दि. 21 ऑक्टोबर) दुसरा डबल हेडर सामना इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघात खेळला जाणार आहे. हा सामना ऐतिहासिक वानखेडे स्टेडिअमवर पार पडणार आहे. या सामन्याला भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी 2 वाजता सुरुवात होणार आहे. त्यापूर्वी उभय संघात नाणेफेक झाली. ही नाणेफेक इंग्लंडचा कर्णधार जोस बटलर याने जिंकली असून गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे.
या सामन्यात इंग्लंड संघात मोठा बदल झाला आहे. बेन स्टोक्स (Ben Stokes) या दिग्गज खेळाडूचे विश्वचषकात पुनरागमन झाले आहे. स्टोक्स आपला विश्वचषक 2023 (World Cup 2023) मधील पहिलाच सामना खेळणार आहे. तसेच, डेविड विली आणि गस एटकिन्सन यांना ख्रिस वोक्स आणि सॅम करन यांच्या जागी संघात जागा मिळाली आहे. दुसरीकडे, दक्षिण आफ्रिका संघाचे नेतृत्व एडेन मार्करम (Aiden Markram) याच्या खांद्यावर आहे. टेम्बा बावुमा या सामन्यात खेळणार नाहीये. बावुमाच्या जागी रीझा हेंड्रिक्सला संधी मिळाली आहे.
स्पर्धेतील दोन्ही संघांची कामगिरी
विश्वचषक 2023 स्पर्धेतील उभय संघांची कामगिरी पाहायची झाली, तर दक्षिण आफ्रिका संघाचे पारडे जड असल्याचे दिसते. कारण, टेम्बा बावुमा (Temba Bavuma) याच्या नेतृत्वाखाली दक्षिण आफ्रिका संघाने 3 सामने खेळले असून त्यातील 2 सामने जिंकले आहेत, तर एक सामन्यात पराभवाचा धक्का सहन करावा लागला आहे. त्यांनी पहिल्या सामन्यात श्रीलंकेविरुद्ध 102 धावांनी विजय मिळवला होता, तर दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध 134 धावांनी विजय साकारलेला. मात्र, तिसऱ्या सामन्यात त्यांना नेदरलँड्सकडून 38 धावांनी पराभूत व्हावे लागले होते. 3 सामन्यात 4 गुणांसह आफ्रिका संघ गुणतालिकेत चौथ्या स्थानी आहे.
दुसरीकडे, इंग्लंड संघ 3 सामन्यांपैकी 2 सामने पराभूत झाला आहे, तर 1 सामना जिंकण्यात त्यांना यश आले आहे. त्यांनी पहिल्या सामन्यात न्यूझीलंडविरुद्ध 9 विकेट्सने पराभव स्वीकारला होता. त्यानंतर त्यांना दुसऱ्या सामन्यात बांगलादेशविरुद्ध 137 धावांनी विजय मिळवण्यात यश आले होते. तसेच, तिसऱ्या सामन्यात पुन्हा त्यांच्यावर अफगाणिस्तानकडून 69 धावांनी पराभूत होण्याची वेळ आली होती.
अशात दक्षिण आफ्रिका तिसऱ्या विजयाच्या शोधात, तर इंग्लंड संघ दुसऱ्या विजयाच्या शोधात असेल. (England have won the toss and have opted to field against south africa)
उभय संघांची प्लेइंग इलेव्हन
इंग्लंड
जॉनी बेअरस्टो, डेविड मलान, जो रूट, बेन स्टोक्स, हॅरी ब्रूक, जोस बटलर (यष्टीरक्षक/कर्णधार), डेविड विली, आदिल रशीद, गस एटकिन्सन, मार्क वूड, रीस टोप्ली
दक्षिण आफ्रिका
क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), रीझा हेंड्रिक्स, रासी व्हॅन डर ड्युसेन, एडेन मार्करम (कर्णधार), हेन्रीच क्लासेन, डेविड मिलर, मार्को यान्सेन, जेराल्ड कोएत्झी, केशव महाराज, कागिसो रबाडा, लुंगी एन्गिडी
हेही वाचा-
पाकिस्तानच्या पराभवाला रोहितच जबाबदार, इंग्लंडच्या माजी दिग्गजाचे खळबळजनक विधान; म्हणाला, ‘DJ वाजवला…’
विश्वचषक 2023च्या सामन्यासाठी Wankhede Stadium सज्ज, तुम्हालाही आठवेल 2011चा ‘तो’ खास क्षण