जगभरातील क्रिकेटप्रेमींमध्ये वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेची क्रेझ पसरली आहे. भारतीय संघ यादरम्यान जबरदस्त फॉर्ममध्ये दिसत आहे. स्पर्धेला सुरुवात होण्यापूर्वीपासून क्रिकेट जाणकार म्हणत आहेत की, भारत किताबाचा प्रबळ दावेदार आहे. आता स्पर्धेतील सलग चार सामन्यात विजय मिळवल्यानंतर भारत खरोखर विजयाचा प्रबळ दावेदार असल्याची चर्चा पुन्हा होताना दिसत आहे. विशेष म्हणजे, भारतीय संघ अखेरचा वनडे विश्वचषक 2011 साली जिंकला होता. या स्पर्धेचा अंतिम सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडिअम येथे पार पडला होता. आता पुन्हा एकदा हे स्टेडिअम विश्वचषक 2023 स्पर्धेच्या सामन्याचे आयोजन करण्यासाठी सज्ज झाले आहे.
खरं तर, 12 वर्षांपूर्वी भारतीय संघाने वानखेडे स्टेडिअम (Wankhede Stadium) या मैदानावर 28 वर्षांचा दुष्काळ संपवत एमएस धोनी (MS Dhoni) याच्या नेतृत्वाखाली विश्वचषक 2011 (World Cup 2011) स्पर्धेचा किताब जिंकला होता. आता याच मैदानावर विश्वचषक 2023 (World Cup 2023) स्पर्धेतील खेळल्या जाणाऱ्या पहिल्या सामन्यासाठी मुंबई क्रिकेट असोसिएशनने शुक्रवारी (दि. 21 ऑक्टोबर) माजी कर्णधार धोनी आणि भारतीय संघाला ट्रिब्यूट दिला आहे.
खरं तर, एमसीएने वानखेडे स्टेडिअममधील दोन विशेष जागा राखून ठेवल्या आहेत. याच जागेवर एमएस धोनीने 2011 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात संघासाठी विजयी षटकार मारला होता. गतविजेता इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघात विश्वचषक 2023मधील 20वा सामना वानखेडेवर खेळला जाणार आहे. या मैदानावर आणखी चार सामन्यांचे आयोजन होणार आहे. त्यात 15 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या उपांत्य सामन्याचाही समावेश आहे. या स्टेडिअमशी भारतीय संघाच्या ऐतिहासिक आठवणी जोडल्या गेल्या आहेत.
एमसीएने ट्विटर अकाऊंटवरून एक फोटो शेअर केला आहे. त्याला कॅप्शन देत लिहिले की, “वानखेडे स्टेडिअमवरील त्या दोन सीट, जिथे एमएस धोनीचा 2011 वनडे विश्वचषक जिंकणारा षटकार पडला होता. हे नेहमी प्रत्येक क्रिकेटप्रेमीसाठी निशाणी असेल.”
The two seats where MS Dhoni's 2011 ODI World Cup winning six landed at the Wankhede Stadium will forever be symbolic to every cricket fan ✨🏆#MCA #MumbaiCricket #IndianCricket #Wankhede #BCCI pic.twitter.com/HM2uFhLz1F
— Mumbai Cricket Association (MCA) (@MumbaiCricAssoc) October 20, 2023
खरं तर, या ठिकाणी स्टँडमध्ये दोन मोठे सोफे लावले गेले आहेत. तसेच, तिथे 2011 विश्वचषकात जल्लोष करतानाचे भारतीय संघाचे पोस्टरही लावले आहे. हे पाहून प्रत्येक क्रिकेटप्रेमी जुन्या आठवणीत हरवून जाईल. भारतीय संघ वानखेडेतील आपला सामना श्रीलंकेविरुद्ध 02 नोव्हेंबर रोजी खेळणार आहे. विशेष म्हणजे, भारतीय संघाने 2011मध्ये श्रीलंकेविरुद्धच अंतिम सामना खेळला होता.
The two seats where MS Dhoni's 2011 ODI World Cup winning six landed at the Wankhede Stadium will forever be symbolic to every cricket fan ✨🏆#MCA #MumbaiCricket #IndianCricket #Wankhede #BCCI pic.twitter.com/HM2uFhLz1F
— Mumbai Cricket Association (MCA) (@MumbaiCricAssoc) October 20, 2023
धोनीची खेळी
वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेच्या अंतिम सामन्यातील धोनीच्या कामगिरीविषयी बोलायचं झालं, तर त्याने मोलाचे योगदान दिले होते. धोनीने त्या सामन्यात 79 चेंडूत 2 षटकार आणि 8 चौकारांच्या मदतीने नाबाद 91 धावांची खेळी साकारली होती. याच जोरावर भारतीय संघाने अंतिम सामन्यात श्रीलंकेला 6 विकेट्सने पराभूत केले होते. धोनीला त्याच्या शानदार खेळीसाठी सामनावीर पुरस्कारानेही गौरवण्यात आले होते. (CWC 2023 wankhade stadium mumbai is ready for there first match you will remember that special moment of 2011 read)
हेही वाचा-
पाकिस्तानच्या संचालकाची इच्छा पूर्ण, AUS vs PAK सामन्यात डीजे वाल्याने वाजवलं Dil Dil Pakistan गाणं- Video
नेदरलँड्सविरुद्ध लाज वाचवण्यासाठी श्रीलंका सज्ज, टॉस गमावत कुसलसेना करणार बॉलिंग