पहिल्या दोन सामन्यात दणदणीत विजय मिळवल्यानंतर, पाकिस्तान संघाला तिसऱ्या आणि चौथ्या सामन्यात दारुण पराभवाचा सामना करावा लागला. तिसऱ्या सामन्यात पाकिस्तान भारतीय संघाकडून 6 विकेट्सने पराभूत झाला होता. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअम येथे रंगलेल्या सामन्यात पाकिस्तान प्रथम फलंदाजी करताना 42.5 षटकात 191 धावांवर सर्वबाद झाला होता. या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघ 30.3 षटकात 3 विकेट्स गमावत आव्हान पार करण्यात यशस्वी झाला होता.
या पराभवानंतर पाकिस्तान (Pakistan) संघाचे संचालक मिकी आर्थर (Mickey Arthur) यांनी विचित्र विधान केले होते. त्यांनी म्हटले होते की, “मी स्टेडिअममध्ये एकदाही विश्वचषक थीम गाणे ‘दिल दिल पाकिस्तान’ (Dil Dil Pakistan) ऐकले नव्हते. त्यामुळे खेळाडूंचा उत्साह वाढतो.”
ऑस्ट्रेलियाविरुद्ध वाजवले गाणे
अशात शुक्रवारी (दि. 20 ऑक्टोबर) पाकिस्तानला चौथ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून 62 धावांनी पराभवाचा सामना करावा लागला. मात्र, यावेळी डीजेने स्टेडिअममध्ये पाकिस्तानी संचालकाचे विधान लक्षात ठेवून ‘दिल दिल पाकिस्तान’ गाणे वाजवले. तरीही पाकिस्तानला पराभवाचा सामना करावा लागला. आता मिकी आर्थर यांना पराभवाचे कारण सांगण्यासाठी नवीन निमित्त शोधावे लागेल. एम चिन्नास्वामी स्टेडिअममधून यादरम्यानचा एक व्हिडिओही जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडिओत ऐकू येते की, पाकिस्तान संघाच्या फलंदाजीदरम्यान हे गाणे वाजवले गेले होते.
Ab toh koi bahana nhi hai bcha shyd…Dil Dil Pakistan bhi bj gya ab toh.. #PAKvAUS pic.twitter.com/KZCOdjmLCB
— Shubham Shrivastav (@shubhshr28) October 20, 2023
चांगली सुरुवात, तरीही पराभव
या सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाने प्रथम फलंदाजी करताना डेविड वॉर्नर (163) आणि मिचेल मार्श (121) यांच्या शानदार द्विशतकीय भागीदारीच्या जोरावर 9 विकेट्स गमावत 367 धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना इमाम उल हक (70) आणि अब्दुल्ला शफीक (64) यांनी पाकिस्तानला मजबूत सुरुवात दिली होती. तसेच, पहिल्या विकेटसाठी 134 धावा जोडल्या. अब्दुल्लाच्या रूपात पाकिस्तानला पहिला झटका बसला.
त्यानंतर संघाने नियमितरीत्या विकेट्स गमावल्या. त्यांचा एकही फलंदाज शेवटपर्यंत टिकू शकला नाही आणि मोठी खेळीही साकारता आली नाही. अशात संपूर्ण संघ 45.3 षटकात अवघ्या 305 धावांवर सर्वबाद झाला. आता पाकिस्तानला पुढील सामन्यात सोमवारी (दि. 23 ऑक्टोबर) अफगाणिस्तानचा सामना करायचा आहे. हा सामना चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडिअमवर खेळला जाणार आहे. (world cup 2023 aus vs pak dj played dil dil pakistan song in m chinnaswamy stadium bengaluru see video here)
हेही वाचा-
नेदरलँड्सविरुद्ध लाज वाचवण्यासाठी श्रीलंका सज्ज, टॉस गमावत कुसलसेना करणार बॉलिंग
चल…! पाकिस्तानला पराभवाची धूळ चारत ऑस्ट्रेलियाचा Points Tableमध्ये राडा, थेट ‘या’ स्थानी घेतली झेप