---Advertisement---

मोहम्मद रिझवानकडून विश्वचषकाचा शुभारंभ! पहिल्याच सराव सामन्यात शतक ठोकत दाखवून दिला फॉर्म

Mohammad Rizwan
---Advertisement---

पाकिस्तानचा यष्टीरक्षक फलंदाज मोहम्मद रिझवान आगामी वनडे विश्वचषकासाठी पूर्णपणे तयार आहे. शक्रवारी (29 सप्टेंबर) रिझवानने न्यूझीलंडविरुद्धच्या सराव सामन्यात आपल्या संघासाठी जबरदस्त फलंदाजी केली. वैयक्तिक शतक केल्यानंतर यष्टीरक्षक फलंदाज रिटायर्ड हर्ट झाला.

वनडे विश्वचषक 2023 (World Cup 2023) ची सुरुवात 5 ऑक्टोबर रोजी होणार आहे. पहिला सामना गतविजेता इंग्लंड आणि न्यूझीलंड या संघांमध्ये होईल. तत्पूर्वी विश्वचषकासाठीचे सराव सामने शुक्रवारी (29 सप्टेंबर) सुरू झाले. या सामन्यांमध्ये दोन्ही संघांना. पाकिस्तानने आपला पहिला सराव सामना न्यूझीलंंडसोबत खेळत आहे. हैदराबादनमध्ये हा सामना खेळला जात असून पाकिस्तनसाठी यष्टीरक्षक फलंदाज मोहम्मद रिझवान याने शतक ठोकले. 94 चेंडू खेळून रिझवानने 103 धावांची महत्वपूर्ण खेळी केली. ही खेळी अजून मोठी होऊ शकत होती. पण त्याआधीच रिझवान रिटायर्ड हर्ट झाला. विशेष म्हणजे विश्वचषक खेळणाऱ्या इतर पाकिस्तानी खेळाडूप्रमाणे मोहम्मद रिझवान (Mohammad Rizwan) कारकिर्दीतील पहिल्यांदाच भारतामध्ये खेळला आणि शतक ठोकले.

उभय संघांतील या सामन्यात रिझवान आणि पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम यांच्यात शतकी भागीदारी झाली. बाबरने 84 चेंडूत 80 धावांची महत्वपूर्ण खेळी केली. मिचेल सॅटनर याच्या चेंडूवर बाबर डार्ली मिचेल याच्या हातात झेलबाद झाला. दरम्यान, उभय संघांतील याय सामन्याची नाणेफेक पाकिस्तानने जिंकली. कर्णधार बाबरने नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. पण पाकिस्तानचे सलामीवीर फलंदाज अपेक्षित प्रदर्शन करू शकले नाहीत.

बाबर आणि रिझवान यांनी संघासाठी तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर खेळताना महत्वपूर्ण धावा केल्या. पण त्याआधी सलामीला आलेल्या अब्दुल्हा शफिक आणि इमाम उल हक य़ांना मोठी खेळी करता आली नाही. दोन्ही फलंदाज अनुक्रमे 14 आणि 1 धाव करून तंबूत परतले. रिझवान तंबूरत परतला त्यावेळी पाकिस्तानची धावसंख्या 40 षटकांमध्ये 4 बाद 294 धावा होती. (A century for Mohammad Rizwan in his warm up match against New Zealand)

महत्वाच्या बातम्या – 
भारतातील त्रासाला वर्ल्डकप सुरू होण्याआधीच कंटाळला जॉनी बेयरस्टो! सोशल मीडियावर निघाला राग
आरसीबीला ट्रॉफी जिंकवण्याची जबाबदारी ‘या’ दिग्गजावर, इंग्लंड क्रिकेटसाठी 12 वर्षांत केलंय खास काम

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---