इंडियन प्रीमियर लीग 2024चा लिलाव दोन ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी गाजवला. मिचेल स्टार्क आणि पॅट कमिन्स या वेगवान गोलंदाजांना आयपीएल इतिहासीतल सर्वात मोठी बोली लागली. कोलकाता नाईट रायडर्सने स्टार्कसाठी 24.75 कोटी, तर सनरायझर्स हैदराबादने 20.50 कोटी रुपयांमध्ये कॅट कमिन्सला खरेदी केले. आयपीएल सामने आणि त्यात टाकल्या जाणाऱ्या चेंडूचा हिशोब केला, तर नक्कीच ही रक्कम मोठी आहे.
आयपीएल 2024साठी खेळाडूंचा लिलावत मंगळवारी (19 डिसेंबर) दुबईमध्ये पार पडला. आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदाज खेळाडूंचा लिलाव भारताबाहेर आयोजित केला गेला होता. मिचेल स्टार्क सर्वात महागडा, तर पॅट कमिन्स दुसरा सर्वात महागडा खेळाड ठरला. कमिन्सच्या नेतृत्वात ऑस्ट्रेलियाने नुकताच वनडे विश्वचषक जिंकला असून मिचेल स्टार्क (Mitchell Starc) या विजयता महत्वाचे योगदान राहिले आहे. आगामी टी-20 विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर दोन्ही दिग्गज आयपीएलमध्ये भाग घेत आहेत. तर दुसरीकडे आयपीएल फ्रँचायझींमध्ये आयपीएलमध्ये या ऑस्ट्रेलियन खेळाडूंना खरेदी करण्यासाठी अक्षरशः झुंबड उडाल्याचे पाहायला मिळाले.
सहभागी खेळणाऱ्या प्रत्येक संघाला किमान 14 सामने खेळावे लागतात. पॅट कमिन्स (Pat Cummins) आणि मिचेल स्टार्क यांनी जर प्रत्येक सामन्यात खेळण्याचा निर्णय घेतला. तरी वेगवान गोलंदाजांचा एक-एक चेंडू फ्रँचायझीला लाखो रुपयांमध्ये पडणार आहे. कमिन्सने जर 14 पैकी 14 सामने खेळले, तर त्याला प्रत्येक सामन्यात 4 षटके या हिशोबाने 336 चेंडू टाकावे लागतील. म्हणजेच कमिन्सचा प्रत्येक चेंडू सनरायझर्स हैदराबादला 6.1 कोटी रुपयांमध्ये पडणार आहे. जर त्यांचा संघ अंतिम सामन्यापर्यंत पोहोचला, तर मात्र कमिन्सचा एक चेंडू फ्रँचायझीला 5 लाख रुपयांमध्ये पडेल.
मिचेल स्टार्क मोठ्या काळानंतर आयपीएल खेळणार आहे. वेगवान गोलंदाज आगामी हंगामातील प्रत्येक सामना खेळणार आहे, असे बोलले जात आहे. स्टार्कने 14 पैकी 14 सामने खेळले तर त्यालाही 336 चेंडू टाकावे लागतील. म्हणजेच त्याच्या एका चेंडूसाठी केकेआरला 7.40 लाख रुपये मोजावे लागणार आहेत. पण कोलकाता नाईट रायडर्स संघ अंतिम सामन्यापर्यंत पोहोचला, तर 17 सामन्यात स्टार्कला एकूण 408 चेंडू टाकावे लागतील. म्हणजेच एका चेंडूला 6.1 लाख रुपये वेगवान गोलंदाजाला मिळतील.
दरम्यान, यावर्षीच्या आयपीएल लिलिवात दरवर्षीप्रमाणे काही युवा आणि नव्या चेहऱ्यांना संधी मिळाली आहे. फ्रँचायझींनी काही युवा खेळाडूंना खरेदी करण्यासाठी कोट्यावधी रुपये खर्च केले आहेत. तर स्टीव स्मिथ, जोश हेजलवूड, फिल साल्ड, जेम्स निशम, रासी वॅन डर ड्युसेन आणि कायल जेमिसन या दिग्गजांना खरेदी करण्यासाठी एकही संघ पुढे आला नाही. एकंदरीत पाहता आगामी हंगामात भारतीय संघाला काही युवा खेळाडू समोर येऊ शकतात. तर महागात विकल्या गेलेल्या खेळाडूंवर चांगले प्रदर्शन करण्याचा दबाव असणार आहे. (A each ball of Pat Cummins and Mitchell Starc will go to an IPL franchise for a few lakh rupees.)
महत्वाच्या बातम्या –
“विदेशी खेळाडू विराट-रोहितपेक्षा जास्त पैसे कमावतात, यालाच कलयूग म्हणायचं का?”
National Sports Awards 2023: शमीसह 26 खेळाडूंना अर्जुन पुरस्कार, बॅडमिंटन स्टार ठरले क्रीडा रत्न