अलीकडच्या काळात टी20 फॉरमॅटची लोकप्रियता वाढत आहे. त्यामुळे वेगवेगळ्या देशांनी आपापल्या देशात फ्रँचायझी क्रिकेट सुरू केले आहे. खरं तर, यामुळे नकारात्मक परिणाम देखील दिसून येत आहेत. काही खेळाडू त्यांच्या देशाचा वार्षिक केंद्रीय करार देखील नाकारत आहेत. असाच प्रकार न्यूझीलंडमध्ये पुन्हा एकदा पाहायला मिळाला. डेव्हॉन कॉनवे आणि फिन ऍलन यांनी केंद्रीय करारातून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. पाकिस्तानचा माजी खेळाडू बासित अली याने याबाबत आपली प्रतिक्रिया दिली असून, टी20 आणि फ्रँचायझी लीगची वाढती लोकप्रियता क्रिकेटसाठी धोकादायक असल्याचे म्हटले आहे.
A former Pakistani cricketer has come down hard on players who have rejected central contracts.
न्यूझीलंड क्रिकेटने काल गुरुवारी (15 ऑगस्ट) पुष्टी केली की डेव्हॉन कॉनवे आणि फिन ऍलन यांनी फ्रँचायझी क्रिकेटमध्ये भाग घेण्याच्या उद्देशाने केंद्रीय करारातून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. कॉनवेला अजूनही विशेष करार देण्यात आला आहे, कारण तो केवळ जानेवारीमध्ये श्रीलंकेविरुद्धच्या मर्यादित षटकांच्या मालिकेत सहभागी होणार नाही. दरम्यान, ॲलनचा आता करार नाही पण गरज पडल्यास तो ही निवडीसाठी उपलब्ध असणार आहे.
आपल्या यूट्यूब चॅनलवर बासित अली म्हणाला की, खेळाडूंनी केंद्रीय करार सोडण्याचा मुद्दा केवळ न्यूझीलंडपुरता मर्यादित राहणार नाही, तर भारत वगळता इतर देशांवर त्याचा परिणाम होईल. येणाऱ्या काळात इतर संघांनाही अशाच परिस्थितीचा सामना करावा लागेल. पाकिस्तानचे खेळाडूही असेच करतील. याचे कारण फ्रँचायझी क्रिकेटमध्ये इतका पैसा आला आहे. या बाबतीत भारत खूप भाग्यवान आहे कारण आयपीएल व्यतिरिक्त, टी -20 थांबणार नाही आणि कसोटी क्रिकेट संपुष्टात येणार.
डेव्हन कॉनवे आणि फिन ऍलन यांच्या आधी केन विल्यमसन, ट्रेंट बोल्ट आणि लोकी फर्ग्युसन यांनीही न्यूझीलंडचा केंद्रीय करार नाकारला आहे. या सर्वांनी फ्रँचायझी क्रिकेटला महत्त्व दिले आहे.
हेही वाचा-
दिनेश कार्तिकने निवडले टीम इंडियाची ऑलटाइम प्लेइंग इलेव्हन, संघातील विश्वासूलाच ठेवले बाहेर
बांग्लादेशमध्ये क्रिकेटमध्ये सत्तापालट होणार! बोर्डाचे अध्यक्ष पायउतार होण्याच्या तयारीत
पाहा 3 क्रिकेटपटू ज्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी ऑलिम्पिकमध्ये घेतला भाग, स्टार खेळाडूच्या भावाचा सामवेश