भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने जाहीर केले आहे की विश्वचषक 2023 मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात खेळल्या जाणार्या सामन्यापूर्वी एका भव्य समारंभाचे आयोजन केले जाईल. यावेळी प्रसिद्ध बॉलीवूड गायक अरजित सिंग, शंकर महादेवन आणि सुखविंदर सिंग आपल्या आवाजाने प्रेक्षकांचे मनोरंजन करतील. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सामना खेळवला जाणार आहे, त्यासाठी दोन्ही संघ तिथे पोहोचले आहेत. गुरुवारी बीसीसीआयने ट्विटद्वारे या कार्यक्रमाची घोषणा केली.
या कार्यक्रमाचा आनंद फक्त तेच चाहते घेऊ शकतात ज्यांनी या सामन्याचे तिकीट घेतले आहे. हा कार्यक्रम दुपारी 12.30 वाजता सुरु होईल तर सामना दुपारी दोन वाजता. परंतु प्रेक्षकांना सकाळी 10 वाजलेपासुनच मैदानात एंट्री दिली जाणार आहे. यावेळेस विश्वचषक स्पर्धेचा उद्घाटन सोहळा आयोजित करण्यात आला नव्हता, त्यामागील कारण असे सांगितले जात होते की, बोर्डाने त्याबाबत अगोदर कोणतीही योजना केली नव्हती.
जर या विश्वचषकाबद्दल सांगायचं झालं तर दोन्ही संघांनी चांगलं प्रर्दशन केलं आहे. दोन्ही संघांनी आतापर्यंत 2-2 सामने जिंकले आहेत. रोहीत शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाला 6 विकेट्सने मात दिली होती, तर दुसऱ्या सामन्यात अफगाणिस्तानला 8 विकेट्सने पराभुत केले आहे. दुसरीकडे पाकिस्तानने नेदरलँड्स आणि श्रीलंका यांच्यावर विजय मिळवला आहे.
भारत आणि पाकिस्तान आशिया कप 2023 मध्ये आमने-सामने आले होते. ज्यामध्ये भारतीय संघाने बाजी मारली होती. भारताने पाकिस्तानला वनडे विश्वचषकात 7 वेळा मात दिली आहे. भारत मागील विक्रम कायम ठेवण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करेल. तर पाकिस्तानचा संघ विश्वचषक स्पर्धेत भारताविरुद्ध पहिला विजय नोंदवण्याच्या इराद्याने मैदानात उतरेल. (A grand function will be held before IND vs PAK match famous Bollywood singers will show magic their voices)
महत्वाच्या बातम्या –
विलियम्सन इज बॅक! बांगलादेशविरुद्ध कॅप्टनने जिंकली नाणेफेक, संघात ‘या’ बदलासह न्यूझीलंड करणार गोलंदाजी
दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा पराभव ऑस्ट्रेलियाच्या जिव्हारी! मागच्या चार मॅचची आकडेवारी मान खाली घालायला लावणारी