आयपीएल २०२१ मधील पहिला क्वालिफायर सामना चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स संघात रविवारी (१० ऑक्टोबर) पार पडला. हा सामना चेन्नईने ४ विकेट्सने खिशात घातला आणि अंतिम सामन्यात धडक दिली. या सामन्याचा शेवट एमएस धोनीच्या चौकाराने झाला. त्याचबरोबर ऋतुराज गायकवाडला त्याच्या तुफान अर्धशतकासाठी सामनावीराचा पुरस्कारही देण्यात आला. मात्र, या सामन्यादरम्यान एका चेन्नई समर्थक चिमुकलीने सर्वांना आपली दखल घ्यायला लावली. आता तिचा आणि धोनीचा एक व्हिडिओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे.
झाले असे की, सामन्याच्या शेवटच्या षटकात चेन्नईला विजयासाठी १३ धावांची आवश्यकता होती. यादरम्यान खेळपट्टीवर मोईन अली आणि धोनी हे खेळाडू होते. यावेळी स्ट्राईक मोईनकडे होती. मात्र, टॉम करन टाकत असलेल्या १९ व्या षटकातील पहिल्याच चेंडूवर मोईन अली कागिसो रबाडाच्या हातून झेलबाद झाला. यावेळी चेन्नईचे खेळाडू बाद होताना पाहून स्टेडिअममधील चिमुकलीने हंबरडा फोडला. ती खूप रडत होती.
#CSKvDC
If someone asks about the dhoni fanbase show them this pic :- pic.twitter.com/nfNiNoOBqf— Anand (@paradoxvella) October 10, 2021
मात्र, मोईन बाद होताच धोनी स्ट्राईकला आला. त्याने दुसऱ्या आणि तिसऱ्या चेंडूवर सलग दोन चौकार लगावले. यानंतर करनने पुढील चेंडू वाईड टाकला. यावेळी चेन्नईला विजयासाठी ३ चेंडूत ४ धावांची आवश्यकता होती. त्यानंतर धोनीने चौथ्या चेंडूवर पुन्हा चौकार मारत सामना खिशात घातला. यानंतर धोनीने चिमुकलीला एक अनोखे गिफ्ट दिले. (A Little CSK Supporter Girl Got Sign Ball From MS Dhoni Who Crying During CSK vs DC Qualifier 1 Match)
धोनीने स्वाक्षरी केलेला चेंडू चिमुकलीला दिला भेट म्हणून
सामना जिंकल्यानंतर धोनीने आपली स्वाक्षरी असलेला एक चेंडू त्या चिमुकल्या मुलीला भेट म्हणून दिला. यावेळी ती खूपच उत्साही होती. यादरम्यानचा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओत दिसते की, धोनी एका चेंडूवर आपली स्वाक्षरी करतो आणि स्टेडिअममध्ये असलेल्या चिमुकलीकडे तो चेंडू फेकतो. यावेळी तो चेंडू फेकताना सांगतो की, चेंडू त्या मुलीला द्यायचा आहे. यादरम्यान मुलीसोबत असणारा मुलगा कदाचित तिचा भाऊ तो चेंडू घेतो.
This is literally us..
The emotions from Sakshi and th se two kids.And the cameo by Dhoni is like the reward he is giving to that girl#CSKvDC #Whistlepodu#finisher My Captain#Thala #vintage #ChennaiSuperKings pic.twitter.com/24FlXkBTaZ
— #Dhoni #SRK #CSK (@nitinalwz) October 10, 2021
या व्हिडिओला चाहत्यांची प्रचंड पसंती मिळत आहे. हा व्हिडिओ आतापर्यंत ६.६ हजारांपेक्षाही अधिक लोकांनी पाहिला आहे. तसेच या व्हिडिओला आतापर्यंत ८०० पेक्षाही अधिक लाईक्स मिळाले आहेत. तसेच हा व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे.
अंतिम सामन्यात चेन्नई
आयपीएल २०२१ च्या अंतिम सामन्याबाबत बोलायचं झालं, तर चेन्नई संघ आता अंतिम सामन्यात पोहोचला आहे. आता सोमवारी (११ ऑक्टोबर) कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघात एलिमिनेटर सामना होणार आहे. यातील जो संघ सामना जिंकेल, तो मंगळवारी (१२ ऑक्टोबर) होणाऱ्या क्वालिफायर २ सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा सामना करेल. त्यातून जो विजयी होईल, तो अंतिम सामन्यात चेन्नईला भिडेल.
महत्त्वाच्या बातम्या-
-मैदानात पाऊल ठेवताच आयपीएलमध्ये ‘हा’ कारनामा करणारा धोनी ठरला पहिलाच खेळाडू
-प्रतिस्पर्धी चेन्नई म्हटलं की शॉची बॅट तळपतेच, पाहा खास आकडेवारी
-एक सर्वात युवा, तर एक वयस्कर कर्णधार, पंत-धोनीच्या नावावर पहिल्या क्लालिफायरमध्ये झाले अनोखे विक्रम