मेलबर्न। ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर आजपासून तिसरा कसोटी सामना सुरु झाली आहे. या सामन्यात खेळाडूंनी नाही तर स्टेडीयमवर आलेल्या प्रेक्षकांनी खास विक्रम केला आहे.
या सामन्याच्या आज पहिल्याच दिवशी 73,516 इतक्या मैदानावर प्रत्यक्ष सामना पहायला आलेल्या प्रेक्षक संख्येची नोंद झाली आहे. ही प्रेक्षक संख्या आत्तापर्यंत ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर झालेल्या कसोटी सामन्यातील पहिल्या दिवशीची सर्वाधिक प्रेक्षक संख्या आहे.
भारताचा ऑस्ट्रेलिया विरुद्धचा मेलबर्नमधील हा एकूण 13 वा कसोटी सामना आहे. याआधी भारताने 1948मध्ये दोन तसेच 1967, 1977, 1981, 1985, 1991, 1999, 2003, 2007, 2011 आणि 2014 मध्ये प्रत्येकी एक कसोटी सामना मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर ऑस्ट्रेलिया विरुद्ध खेळला आहे.
यांतील 1948 ते 1985 पर्यंत मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर झालेल्या कसोटी सामन्यातील पहिल्या दिवशीची प्रेक्षक संख्या ही 12 हजार ते 30 हजारादरम्यान राहिली आहे. अपवाद फक्त 1948 मध्ये झालेल्या ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारताच्या पहिल्या कसोटी सामन्याचा आहे. या सामन्यात 45 हजारांपेक्षा अधिक प्रेक्षक पहिल्या दिवशी सामना पाहण्यासाठी मैदानावर हजर होते.
1991 पासून मात्र ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर झालेल्या कसोटी सामन्यातील पहिल्या दिवशीची प्रेक्षक संख्या कधीही 42 हजारांपेक्षा खाली गेलेली नाही. यावर्षी तर विक्रमी 73,516 इतक्या प्रेक्षक संख्येची नोंद झाली आहे.
https://www.instagram.com/p/Br1flYyhva6/
भारताचा कर्णधार विराट कोहलीनेही या सामन्याच्या आधी 80 हजार प्रेक्षकासमोेर खेळणे हा सन्मान असल्याचे म्हटले होते.
ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर झालेल्या कसोटी सामन्यातील पहिल्या दिवशीची मैदानातील प्रेक्षक संख्या –
1948 – 45,327(पहिला सामना), 22,748 (दुसरा सामना) – प्रेक्षक संख्या
1967 – 12,688 प्रेक्षक संख्या
1977 – 26,110 प्रेक्षक संख्या
1981 – 16,704 प्रेक्षक संख्या
1985 – 29,108 प्रेक्षक संख्या
1991 – 42,494 प्रेक्षक संख्या
1999 – 49,082 प्रेक्षक संख्या
2003 – 62,613 प्रेक्षक संख्या
2007 – 68,778 प्रेक्षक संख्या
2011 – 70,068 प्रेक्षक संख्या
2014 – 70,000 प्रेक्षक संख्या
2018 – 73,516 प्रेक्षक संख्या
महत्त्वाच्या बातम्या:
–मयंक अगरवाल असा पराक्रम करणारा केवळ पाचवा भारतीय सलामीवीर फलंदाज
–पदार्पणाच्या सामन्यात शानदार अर्धशतक करणाऱ्या मयंक अगरवालने केला हा खास विक्रम
–पहिला सामना खेळणाऱ्या मयांक अगरवालने मैदानात पाय ठेवताच झाला विक्रम