fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

पदार्पणाच्या सामन्यात शानदार अर्धशतक करणाऱ्या मयंक अगरवालने केला हा खास विक्रम

मेलबर्न। आजपासून(26 डिसेंबर) ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात तिसरा कसोटी सामना मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर सुरु झाला आहे. या सामन्यात भारताचा सलामीवीर फलंदाज मयंक अगरवालने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले आहे.

मयंकने त्याच्या पदार्पणाच्या कसोटी सामन्यातील पहिल्याच डावात 95 चेंडूत अर्धशतक पूर्ण करताना खास विक्रम केला आहे.

तो कसोटी पदार्पणाच्या सामन्यात पहिल्या डावात 50 किंवा त्यापेक्षा अधिक धावा करणारा भारताचा सातवा सलामीवीर फलंदाज आहे. याआधी शिखर धवन, पृथ्वी शॉ, केसी इब्राहिम, सुनील गावसकर, अरुण लाल आणि दिलवर हुसेन यांनी हा पराक्रम केला आहे.

मयंकने या सामन्यात त्याचे आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील पहिले अर्धशतक नॅथन लायनच्या गोलंदाजीवर चौकार ठोकत पूर्ण केले.

त्याने या डावात सुरुवातीला हनुमा विहारी बरोबर 40 धावांची सलामी भागीदारी केली होती. पण विहारी 8 धावांवर असताना पॅट कमिन्सच्या गोलंदाजीवर बाद झाला. त्यानंतर मयंक आणि चेतेश्वर पुजाराने नाबाद अर्धशतकी भागीदारी केली आहे.

कसोटी पदार्पणाच्या पहिल्या डावात 50 किंवा त्यापेक्षा अधिक धावा करणारे भारतीय सलामीवीर फलंदाज-

187 धावा – शिखर धवन (ऑस्ट्रेलिया विरुद्ध, 2013)

134 धावा – पृथ्वी शॉ (विंडीज विरुद्ध, 2018)

85 धावा – केसी इब्राहिम (विंडीज विरुद्ध, 1948)

65 धावा – सुनील गावसकर (विंडीज विरुद्ध,1971)

63 धावा – अरुण लाल (श्रीलंका विरुद्ध, 1982)

59 धावा – दिलवर हुसेन (इंग्लंड विरुद्ध, 1934)

58 धावा* – मयंक अगरवाल (ऑस्ट्रेलिया विरुद्ध, 2018)

महत्त्वाच्या बातम्या:

पहिला सामना खेळणाऱ्या मयांक अगरवालने मैदानात पाय ठेवताच झाला विक्रम

८२ वर्षांनी टीम इंडियाला अनुभवयाला मिळाला हा सुवर्णक्षण

२०१८मध्ये क्रिकेटमध्ये झाले हे मोठे ५ वाद

You might also like