पाकिस्तानचे माजी पंतप्रथान आणि पाकिस्तान तहरिक-ए-इंसाफचे अध्यक्ष इम्रान खान यांना अटक करण्यासाठी इस्लामाबाद पोलीस त्यांच्या घरी जाणार आहे. येत्या 24 तासांमध्ये ही कारवाई होऊ शकते. एक महिला न्यायाधीश आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याला धमकावण्या प्रकरणी इम्रानविरोधात इस्लामाबाद न्यायालयाने अजामीनपात्र वारंट जारी केले आहे. याच पार्श्वभूमीवर इस्लामाबादवरून पोलिसांची एक तुकडी हेलिकॉप्टरसह लाहोरमध्ये दाखल झाली.
माध्यमांतील वृत्तांनुसार इस्लामाबाद आणि लाहोर पोलिसांमध्ये एक महत्वाची बैठक पार पडणार आहे, ज्यात इम्रान खान (Imran Khan) यांना अटक करण्याविषयी महत्वाचे निर्णय घेतले जातील. दरम्यान, ही दुसरी वेळ आहे, जेव्हा माजी पाकिस्तानी क्रिकेटपटू इम्रान खान यांना अटक करण्यासाठी इस्लामाबाद पोलीस लाहोरमध्ये दाखल झाली आहे.
सूत्रांच्या हावाल्याने असे सांगितले गेले आहे की, लाहोर पोलीस इस्लामाबाद पोलिसांना या अटकेसाठी सपूर्ण मदत करतील. तसेच कोणतीही बाधा न येता जमान पार्कमधील इम्रानच्या घरापर्यंत कसे पोहोचायचे, याची रणनीती बैठकीत आखली जाईल. दरम्यान मागच्या वर्षी 20 ऑगस्ट रोजी एका रॅलीमध्ये इम्रान यांनी न्यायाधीश जेबै चौधरी आणि पोलीस अधिकाऱ्यांना धमकावण्याचा प्रयत्न केला, असा आरोप त्यांच्यावर केला गेला होता.
दरम्यान, इम्रान यांनी ऑगस्ट 2018 रोजी पाकिस्तानच्या पंतप्रधापदाची जबाबदारी स्वीकरली होती. पुढे एप्रिल 2022 पर्यंत त्यांनी पाकिस्तानचा कारभार पाहिला आणि नंतर हे पद सोडावे लागले. त्यांच्या क्रिकेट कारकिर्दीचा विचार केला, तर मोठ्या काळापर्यंत पाकिस्तान क्रिकेट संघाचे नेतृत्व केले. 70 वर्षीय इम्रान यांनी देशासाठी 88 कसोटी आणि 175 वनडे सामने खेळले. यामध्ये त्याने अनुक्रमे 3807 आणि 3709 धावा केल्या, तर 362 आणि 182 अशा विकेट्स घेतल्या.
(A non-bailable arrest warrant has been issued against Irman Khan and a police helicopter has arrived in Lahore.)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
पहिल्या WPL मध्ये स्मृती ‘सुपरफ्लॉप’! पाच सामन्यात फलंदाजीसह नेतृत्वातही झिरो
रोहित शर्मापूर्वी ‘हे’ भारतीय कर्णधार खेळलेत आयसीसी ट्राफींची फायनल, पाहा संपूर्ण यादी