Friday, March 31, 2023
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पहिल्या WPL मध्ये स्मृती ‘सुपरफ्लॉप’! पाच सामन्यात फलंदाजीसह नेतृत्वातही झिरो

March 13, 2023
in WPL, क्रिकेट, टॉप बातम्या
Photo Courtesy: Twitter

Photo Courtesy: Twitter


भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) प्रथमच आयोजित केलेल्या वुमेन्स प्रिमियर लीग स्पर्धेचा अर्धा हंगाम जवळपास पार पडला आहे. सहभागी असलेल्या पाच संघांपैकी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (आरसीबी) हा एकमेव संघ अद्याप एकही विजय नोंदवू शकला नाही. भारतीय क्रिकेट संघाची उपकर्णधार स्मृती मंधाना ही या संघाचे नेतृत्व करत आहे. संघ अपयशी ठरत असताना स्वतः कर्णधार म्हणून देखील स्मृती आत्तापर्यंत अपयशी ठरलीये.

या स्पर्धेसाठी ज्यावेळी खेळाडूंचा लिलाव पार पडला त्यावेळेस स्मृतीवर आरसीबीने सर्वाधिक 3 कोटी 40 लाखांची बोली लावत तिला आपल्या संघात सामील करून घेतले. याबरोबरच ती स्पर्धेतील सर्वात महागडी खेळाडू ठरली. त्यासोबत संघात एलिस पेरी, हिदर नाईट, रेणुका ठाकूर,‌ रिचा घोष व मेगन शूट यांसारख्या दिग्गज खेळाडूंना संघात सामील करून घेतले. मात्र, आतापर्यंत खेळलेल्या 5 ही सामन्यात संघाला विजय नोंदवता आला नाही.

कर्णधार म्हणून स्मृती पूर्णपणे अपयशी ठरली असतानाच फलंदाज म्हणून देखील ती फारशी चमकदार कामगिरी करू शकली नाही.‌ दिल्लीविरुद्धच्या पहिल्या सामन्यात तिने 35 धावांची खेळी केली. त्यानंतर मुंबईविरुद्धही 23 धावा मात्र या दोन्ही सामन्यात ती धावांचा अपेक्षित वेग राखू शकली नव्हती. त्यानंतर गुजरातविरुद्ध 18 तर युपीविरुद्ध केवळ 4 धावा करण्यात तिला यश आले. तर दिल्लीविरुद्धच्या पाचव्या सामन्यातही तिला 8 धावांच्या पुढे मजल मारता आली नाही. तिने या पाच सामन्यात 17.6 च्या मामुली सरासरीने केवळ 88 धावा केल्या आहेत.

एका बाजूने भारतीय संघातील इतर फलंदाज या संपूर्ण स्पर्धेवर आपली छाप पाडण्यात यशस्वी ठरत असताना, स्मृतीचे अपयश सर्वांच्या नजरेत भरणारे आहे.

(Smriti Mandhana Flop As Batter And Captain For RCB In WPL 2023)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
मालिकावीर पुरस्काराच्या 2.5 लाखांची अश्विन-जडेजाने केली चुकीची वाटणी? व्हिडिओ जोरदार व्हायरल
टॉसचा निकाल दिल्लीच्या पारड्यात, दोन बदलांसह मैदानात उतरणार राजधानी; RCB पहिल्या विजयासाठी सज्ज


Next Post
Steve Smith

मोठी बातमी । भारताविरुद्धच्या वनडे मालिकेपूर्वी स्टीव स्मिथ बनला ऑस्ट्रेलियाचा कर्णधार!

Imran Khan

पुढच्या 24 तासात इम्रान खान गजाआड जाणार? हेलिकॉप्टर घेऊन पोलीस लाहोरमध्ये दाखल

Photo Courtesy: Twitter/@EnglandCricket

भारतातील आगामी विश्वचषक मोईन अलीसाठी शेवटचा? दिग्गज अष्टपैलू निवृत्तीच्या तयारीत

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143