भारतीय संघ आगामी बांगलादेशसोबत घरच्या मैदानावर 2 सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. त्यासाठी भारतीय संघ सध्या चेन्नईमध्ये सराव करत आहे. तत्पूर्वी ज्या भारतीय खेळाडूंना काही काळ भारतीय संघात संधी न मिळाल्याने खेळाडू निवृत्तीची घोषणा करत आहेत. शिखर धवनला (Shikhar Dhawan) देखील काही काळ भारतीय संघापासून दूर राहावे लागले. त्यामुळे त्याने निवृत्तीची घोषणा केली. आता एका भारतीय खेळाडूबद्दलही अशीच बातमी समोर येत आहे.
भारतीय संघाचा स्टार गोलंदाज भुवनेश्वर कुमार (Bhuvneshwar Kumar) बऱ्याच दिवसांपासून भारतीय संघापासून दूर आहे. त्याला खूप दिवसांपूर्वी भारतीय संघात संधी मिळाली होती. त्याने भारतासाठी शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना नोव्हेबर 2022 मध्ये खेळला होता. 2 वर्ष झाले तो संघातून बाहेर आहे, त्यामुळे चर्चा होऊ लागल्यात की, भुवनेश्वरचे भारतीय संघात पुनरागमन होणे शक्य नाही. कारण भारतीय संघ सध्या युवा वेगवान गोलंदाजांकडे आकर्षित होऊ लागला आहे.
सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल झाली आहे. त्यामध्ये असा दावा केला जात आहे की, भारतीय संघाचा स्टार वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार (Bhuvneshwar Kumar) लवकरच निवृत्तीची घोषणा करेल. पण व्हायरल झालेली पोस्ट कितपत खरी आहे याच्याबाबत अद्याप स्पष्टता नाही.
Big Breaking:
Bhuvneshwar Kumar may retire from international cricket soon.#INDvsPAK #Hockey #DuleepTrophy #ViratKohli Bumrah #SuryakumarYadav Pakistan #INDvBAN Morne Morkel #TeamIndia pic.twitter.com/kY02rw7x5W
— Cricket Kota Factory (@cricketkot44370) September 14, 2024
भुवनेश्वर कुमारच्या (Bhuvneshwar Kumar) आंतरराष्ट्रीय कारकीर्दीबद्दल बोलायचे झाले, तर त्याने भारतासाठी 21 कसोटी, 121 एकदिवसीय आणि 87 टी20 सामने खेळले आहेत. 21 कसोटी सामन्यात त्याने 26.09च्या सरासरीने गोलंदाजी करत 63 विकेट्स त्याच्या नावावर केल्या आहेत. 96/8 ही त्याची उत्कृष्ट गोलंदाजी राहिली आहे. 121 एकदिवसीय सामन्यात त्याने 35.11च्या सरासरीने गोलंदाजी करत 141 विकेट्स त्याच्या नावावर केल्या आहे. तर 87 टी20 सामन्यात 23.10च्या सरासरीने गोलंदाजी करत 90 विकेट्स घेतल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
भारत-पाकिस्तान सामन्यात मोठा राडा! मैदानावरच भिडले दोन्ही संघांचे खेळाडू
मुंबई इंडियन्सकडून पदार्पण केलेल्या ‘या’ गोलंदाजापुढे स्टार फलंदाज गार
“भारतीय गोलंदाज इतरांपेक्षा वेगळे…” नव्या गोलंदाजी प्रशिक्षकाचे मोठे वक्तव्य