महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये मॅरेथॉन स्पर्धा होत असतात. त्यापैकीच एक सातारा हाफ हिल मॅरेथॉन (Satara Half Hill Marathon). ही स्पर्धा चांगली सुरू झाली असताना एक धक्कादायक घटना घडली आहे. या स्पर्धेत एका धावपटूचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचे वृत्त समोर येत आहे. स्पर्धेत धावणारा तो स्पर्धक हा मूळचा कोल्हापूर जिल्ह्यातील (Kolhapur)असून त्याचे नाव राज पटेल आहे, अशी माहिती पुढे येत आहे. तसेच राज हा राष्ट्रीय टेबल टेनिस खेळाडू असल्याचेही समजते.
मिळालेल्या माहितीनुसार, ही संपर्ण घटना सातारा मॅरथॉन स्पर्धा सुरु असताना घडली. मॅरथॉन स्पर्धा सुरु झाल्यानंतर स्पर्धेच्या परतीच्या मार्गादरम्यान ही दुर्देवी घटना घडली. स्पर्धक साताऱ्यातील पोलीस परेड ग्राऊंड ते कांस रोड आणि पुन्हा कांस रोड ते पोलीस परेड ग्राऊंड अशा परतीच्या मार्गावर होते. त्याच दरम्यान अचानकपणे राज पटेल (Raj Patel) याच्या छातीत दुखायला लागले. त्यामुळे तो जागेवरच जमिनीवर कोसळला. त्यानंतर त्याचा जागेवर मृत्यू झाल्याचे समोर येत आहे.
घटना घडल्यानंतर त्याला प्राथमिक उपचार देण्याचा प्रयत्नही करण्यात आला पण तोवर त्याचा मृत्यू झाला होता. घटनेनंतर त्याचा मृतदेह साताऱ्याच्या प्रशासकीय रुग्णालय (Satara Government Hospital) या ठिकाणी नेण्यात आले आहे.
साताऱ्याच्या या हाफ हिल मॅरेथॉन स्पर्धेत मोठ्या प्रमाणात स्पर्धक सहभागी होत असतात. आसपासच्या जिल्ह्यातील स्पर्धकही स्पर्धेत सहभाग घेत असतात. राज हा देखील कोल्हापूरचा असून या स्पर्धेत सहभागी झाला होता. मात्र त्याच्या मृत्यूने स्पर्धेत एक प्रकारचे वेगळेच वातावरण निर्माण झाले असून स्पर्धांनीही दु:ख व्यक्त केले आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
जयवर्धनेची भविष्यवाणी! टी-20 विश्वचषकात ‘हा’ खेळाडू नसल्यामुळे भारताला सोसावे लागणार नुकसान
‘या’ चौघांमुळे भारताला कसलेचे टेंशन नाही, टी-20 विश्वचषकात अडचणीच्या वेळी येतील कामी
‘ब्लू जर्सी’त पुनरागमन करण्यासाठी उमेश यादव तयार, 43 महिन्यांनंतर खेळणार टी-20 मालिका