---Advertisement---

गांगुलीच्या संघ निवडीत दखल देण्याच्या चर्चांवर निवड समिती सदस्याची लक्षवेधी प्रतिक्रिया; “तो हस्तक्षेप…”

On: गुरूवार, फेब्रुवारी 3, 2022 9:44 PM
Ganguly-in-team-selection
---Advertisement---

बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) आणि विराट कोहली (Virat kohli)यांच्यातील वाद अलिकडच्या काही दिवसांमध्ये शांत झाला होता. पण तितक्यातच सौरव गांगुली पुन्हा एकदा चाहत्यांच्या निशाण्यावर आले आहेत. गांगुली संघाच्या निवड समितीच्या बैठकीत सहभागी झाल्यामुळे वाद निर्माण झाला आहे. बीसीसीआयच्या नियमांनुसार बीसीसीआय अध्यक्ष निवड समितीच्या बैठकीत सहभागी होऊ शकत नाहीत. आता याच संदर्भात निवड समितीच्या एका अधिकाऱ्याकडून मोठी प्रतिक्रिया आली आहे.

निवड समितीच्या अधिकाऱ्यांच्या मते गांगुलींने निवड प्रक्रियेत कधीच प्रत्यक्ष हस्तक्षेप केला  नाही, पण त्यांची बैठकीतील उपस्थितीच भितीदायक असते. अधिकाऱ्यांच्या हवाल्याने इनसाइडस्पोर्ट्सने सांगितले की, “जे आहे ते आहे. तुम्ही तुमच्या वरच्या अधिकाऱ्याकडे तक्रार करू शकत नाही, हो ना? त्यानी (सौरव गांगुली) निवड प्रक्रियेत दखल दिली आहे का? तर नाही. त्यांनी कधिच तसे केले नाही. परंतु त्यांची उपस्थितीच भितीदायक आहे. कारण ते बीसीसीआय अध्यक्ष आहेत. मी याविषयी अधिक काही बोलू शकत नाही.”

हेही वाचा- ‘..म्हणूनच टीम इंडियाची डुबलीय नौका’; बीसीसीआय अध्यक्ष असूनही गांगुलीचा संघ निवडीत हस्तक्षेप, भडकले चाहते

अलिकाडच्या काही दिवसांमध्ये माध्यमांतील वृत्तांमध्ये अशी माहिती समोर आली आहे की, सौरव गांगुली निवड समितीच्या बैठकीत जबरदस्ती सहभागी होतात. पाहायला गेले, तर त्यांनी या बैठकीत उपस्थित राहण्याचा काहीच संबंध नाहीय. यसंदर्भात इनसाइड स्पोर्ट्ने जेव्हा पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली, तेव्हा वेगवेगळी उत्तरे मिळाली. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, अशा सर्व बातम्या खोट्या आहेत. तर दुसऱ्या एका अधिकाऱ्याने सांगितल्याप्रमाणे या बातम्या खऱ्या आहेत. एका अधिकाऱ्याने पुष्टी केली की, गांगुली एक दोनदा नाही तर अनेकदा निवड समितीच्या बैठकीत सहभागी झाले आहेत.

दरम्यान, विराटने मागच्या वर्षी टी-२० विश्वचषकानंतर भारताच्या टी-२० संघाचे कर्णधारपद सोडले. त्यानंतर बीसीसीआयने विराटकडून एकदिवसीय संघाचे कर्णधारपद काढून घेतले आणि यानंतर बीसीसीआय विरुद्ध विराट असे चित्र निर्माण होऊ लागले होते. एकदिवसीय संघाचे कर्णधारपद काढून घेतल्यानंतर सौरव गांगुलींना यासंदर्भात स्पष्टीकरण दिले आणि सांगितले की, त्यांनी स्वतः विराटला टी-२० संघाचे कर्णधारपद न सोडण्याचा सल्ला दिला होता. याउलट दक्षिण अफ्रिका दौऱ्यापूर्वी विराटनेही पत्रकार परिषद घेतली आणि स्पष्ट केले की, टी-२० संघाच्या कर्णधारपदाविषयी त्याच्यासोबत कोणीच चर्चा केली नव्हती. यानंतर विराट आणि गांगुली यांच्यातील मतभेत जगासमोर आले होते.

दक्षिण अफ्रिका दौऱ्यानंतर विराटने कसोटी संघाच्या कर्णधारपदावरून माघार घेतली. विराटच्या या निर्णयामागेही गांगुलींची भुमिका मोठी असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

महत्वाच्या बातम्या –

आरसीबीच्या ‘या’ खेळाडूने कोट्यवधी सोडून करियरला दिले प्राधान्य, मेगा ऑक्शनमध्ये नाही नोंदवले नाव

वडिलांना बनवायचं होतं इंजिनियर, पण पोरानं निवडलं क्रिकेट; आता सेमीफायनलमध्ये ५००च्या स्ट्राईक रेटने काढल्या धावा

कर्णधार यशच्या शतकानंतर लक्ष्मणच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता अभिमान, रिऍक्शनचा व्हिडिओ व्हायरल

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---