क्रिकेट हा खेळ असा आहे ज्यात काहीही होऊ शकते. काही वेळा वडिल-मुलगा एकत्र आपण खेळताना पाहिले आहे. कधी दोन भाऊ एकाच सामन्यात खेळताना पाहिले आहे. तर कधी काका-पुतणे, गुरू-शिष्य यांनाही आपण एकत्र खेळताना पाहिले आहे.
परंतु पंच वडिलांनी खेळाडू मुलाला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कधी बाद दिलेले पाहिले आहे का? तर क्रिकेटमध्ये ही गोष्टही झालेली आहे.
बांगलादेशने २००६साली केनियाचा दौरा केला होता. या दौऱ्यात त्यांनी ३ वनडे सामने खेळले होते. हे तीनही सामने बांगलादेश संघाने जिंकले देखील होते. या तीनही सामन्यात फिल्ड अंपायर म्हणून भारताचे क्रिष्णा हरिहरन व केनियाच्या सुभाष मोदी यांनी काम पाहिले होते.
याच सामन्यात सुभाष मोदी यांचा मुलगा हितेश मोदी हा केनिया संघाकडून खेळत होता. यातील दुसऱ्या वनडे सामन्यात बांगलादेशचा वेगवान गोलंदाज मर्श्रफी मुर्तझाने हितेशला पायचीत केले. त्यावेळी फिल्डवर पंच म्हणून सुभाष मोदी काम पाहत होते. त्यांनी तात्काळ फलंदाजी करत असलेल्या आपल्या मुलाला बाद दिले. A father being an on-field umpire ruled his son out in international cricket.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील हा एकमेव असा क्षण राहिला ज्यात वडिलांनी मुलाला बाद दिले होते. सुभाष मोदी यांनी एकूण २२ वनडे सामन्यात पंचगिरी केली तर मुलगा हितेश मोदी केनियाकडून ६३ वनडे सामने खेळला. सुभाष मोदी हे केनियात स्थायिक असून त्यांचे सध्याचे वय ७६ वर्ष आहे तर मुलगा हितेशचे वय ५१ वर्ष आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
महिला आशिया चषकाच्या इतिहासात भारत सलग 8व्यांदा अंतिम फेरीत, थायलंडचा दारूण पराभव
T20 World Cup: बंगळुरू ते ऑस्ट्रेलिया, मोहम्मद शमीने सोशल मीडियावर पोस्ट करत दिली माहिती
झंझावाती शतकासह ‘या’ खेळाडूने ठोकली टीम इंडियात कमबॅकची दावेदारी; आयपीएलमध्येही मारलेल मैदान