आगामी इंडियन प्रीमिअर लीगच्या 18व्या हंगामाला (22 मार्च) पासून सुरुवात होणार आहे. आयपीएल 2025 चा पहिला सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या दोन संघात खेळला जाणार आहे. त्याचबरोबर लखनौ सुपर जायंट्स आपला पहिला सामना (24 मार्च) रोजी दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध त्यांच्याच मैदानावरती खेळणार आहे.
आयपीएलच्या या हंगामात लखनौचा संघ आपला नवीन कर्णधार रिषभ पंत याच्या नेतृत्वाखाली मैदानात उतरणार आहे. लखनौ संघाचा पहिला सामना (24 मार्च) रोजी दिल्ली कॅपिटल्स सोबत होईल व शेवटचा सामना (18 मे) ला सनरायजर्स हैद्राबाद सोबत खेळला जाईल. लखनौ सुपर जायंट्स हा संघ आपले सातही सामने लखनौ मधीलच इकाना स्टेडियम वरती खेळणार आहे.
लखनौ सुपर जायंट्सचे संपूर्ण वेळापत्रक
27 मार्चला लखनौ सुपर जायंट्सविरुद्ध सनरायजर्स हैद्राबाद
1 एप्रिलला लखनौ सुपर जायंट्सविरुद्ध पंजाब किंग्स
4 एप्रिलला लखनौ सुपर जायंट्सविरुद्ध मुंबई इंडियन्स
6 एप्रिलला लखनौ सुपर जायंट्सविरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स
12 एप्रिलला लखनौ सुपर जायंट्सविरुद्ध गुजरात टायटन्स
14 एप्रिलला लखनौ सुपर जायंट्सविरुद्ध चेन्नई सुपर किंग्स
19 एप्रिलला लखनौ सुपर जायंट्सविरुद्ध राजस्थान रॉयल्स
22 एप्रिलला लखनौ सुपर जायंट्सविरुद्ध दिल्ली कॅपिटल्स
27 एप्रिलला लखनौ सुपर जायंट्सविरुद्ध मुंबई इंडियन्स
4 मे ला लखनौ सुपर जायंट्सविरुद्ध पंजाब किंग्स
9 मे ला लखनौ सुपर जायंट्सविरुद्ध आरसीबी
12 मे ला लखनौ सुपर जायंट्सविरुद्ध गुजरात टायटन्स
18 मे ला सनरायजर्स हैद्राबाद
आयपीएलच्या 18व्या हंगामाचे सामने एकूण 13 शहरात खेळले जाणार आहेत. आयपीएल 2025 चे सामने लखनौ, मुंबई, हैद्राबाद, चेन्नई, अहमदाबाद, विशाखापट्टणम, गुवाहाटी, बंगळुरू, न्यू. चंदीगड, जयपूर, दिल्ली, कोलकाता आणि धर्मशाला येथे खेळले जातील. आयपीएल 2025 मध्ये एकूण 12 डबल हेडर सामने आहेत. म्हणजेच एका दिवसात 12 वेळा दोन-दोन सामने खेळले जातील.
दरवर्षी आयपीएलचा पहिला सामना नेहमी गेल्या हंगामातील फायनल खेळणाऱ्या दोन संघात खेळला जातो, परंतु यावेळी असे होणार नाहीये. आयपीएल 2024 मध्ये अंतिम टप्प्यात कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायजर्स हैद्राबाद या दोन संघात सामना झाला होता, पण 2025 हंगामाचा पहिला सामना केकेआर आणि आरसीबी या दोन संघात खेळला जाणार आहे.
महत्वाच्या बातम्या :
मुंबई इंडियन्स संकटात! IPL च्या पहिल्या सामन्याला मुकणार कर्णधार हार्दिक पांड्या
केकेआर विरुद्ध आरसीबीने आयपीएल 2025 ला सुरुवात, केकेआरचे संपूर्ण वेळापत्रक
आरसीबीच्या सामन्यापासून आयपीएल 2025 ची होणार सुरुवात, केकेआर विरुद्ध खेळणार पहिला सामना