---Advertisement---

आरसीबीच्या सामन्यापासून आयपीएल 2025 ची होणार सुरुवात, केकेआर विरुद्ध खेळणार पहिला सामना

Royal-Challengers-Bangalore
---Advertisement---

आगामी इंडियन प्रीमियर लीग (indian premier league) स्पर्धा 22 मार्चपासून सुरू होणार आहे. नुकतच स्पर्धेचं संपूर्ण वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. आयपीएल 2025 ची सुरुवात चाहत्यांच्या सर्वात आवडत्या संघाच्या सामन्यापासून होणार आहे. स्पर्धेचा पहिला सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु आणि कोलकाता नाईट रायडर्स दोन्ही संघांमध्ये 22 मार्च रोजी खेळला जाणार आहे. आरसीबी संघ मागच्या हंगामात फक्त 6 सामने जिंकून प्लेऑफ मध्ये पोहोचला होता. पण एलिमिनेटर सामन्यात राजस्थान रॉयल्सकडून आरसीबीचा पराभव झाला होता.

केकेआर गतविजेता संघ आहे ,ज्यामध्ये आता बरेच बदल झालेले दिसून येतील. तसेच आरसीबीच्या संघाने रजत पाटीदारला संघाचा कर्णधार म्हणून घोषित केले आहे आहे.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचा पहिला सामना 22 मार्च रोजी कोलकाता नाईट रायडर्स संघाविरुद्ध होणार आहे. तसेच आरसीबीचा दुसरा सामना 28 मार्च रोजी चेन्नई सुपर किंग्स संघाबरोबर होणार आहे. चाहत्यांचे आवडते खेळाडू विराट कोहली आणि महेंद्र सिंग धोनी यांच्यातील सामना चांगलाच रंगताना दिसेल. स्पर्धेतील आरसीबी संघाचा शेवटचा सामना 17 मे कोलकाता संघासोबत होईल.

आयपीएल 2025 स्पर्धेत आरसीबी संघाचे पूर्ण वेळापत्रक

22 मार्च -रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स

28 मार्च -रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुविरुद्ध चेन्नई सुपर किंग्स

2 एप्रिल -रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध गुजरात टायटन्स

7 एप्रिल -रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध मुंबई इंडियन्स

10 एप्रिल -रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध दिल्ली कॅपिटल्स

13 एप्रिल -रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध राजस्थान रॉयल्स

18 एप्रिल -रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध पंजाब किंग्स

20 एप्रिल -रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध पंजाब किंग्स

24 एप्रिल- रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध राजस्थान रॉयल्स

27 एप्रिल – रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध दिल्ली कॅपिटल्स

3 मे -रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध चेन्नई सुपर किंग्स

9 मे- रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स

13 मे -रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध सनरायजर्स हैदराबाद

17 मे- रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध कोलकत्ता नाईट रायडर्स

 

हेही वाचा 

या संघासोबत csk खेळणार पहिला सामना ; संपूर्ण वेळापत्रक झाले जाहीर

चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारतीय संघ रचेल का‌ नवा इतिहास‌?

TNPL ते IPL ; वॉशिंग्टन सुंदरच्या कमाईतील जबरदस्त तफावत, जाणून घ्या

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---