आयपीएल 2025 चे संपूर्ण वेळापत्रक जाहीर झाले आहे. आयपीएल हंगामाचा सर्वात पहिला सामना 22 मार्चला कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या दोन संघात खेळला जाणार आहे,त्याचवेळी या मैदानावर सीएसके आणि मुंबई इंडियन्स समोरासमोर असतील.संघांनी 5 वेळा आयपीएलची ट्रॉफी आपल्या नावी केली आहे.संघात एमएस धोनी खेळताना दिसणार आहे, पण कर्णधार पदाची धुरा ऋतुराज गायकवाडकडे असणार आहे.
चेन्नई सुपर किंग्सचा पहिला सामना (23 मार्च) रोजी मुंबई इंडियन्स सोबत असेल, तर पुढचा सामना (28 मार्च) ला आरसीबी सोबत असेल.स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्स संघ सात सामने घरच्या मैदानावरती तर बाकी सात सामने विरोधी संघाच्या मैदानावर खेळेल. गेल्या हंगामात चेन्नई सुपर किंग्स प्लेऑफ मध्ये जाण्यापासून वंचित राहिली होती.चेन्नईचा लीग स्टेज मध्ये शेवटचा सामना (18 मे) ला गुजरात टायटन्स सोबत होईल.
आयपीएल 2025 साठी CSK चे संपूर्ण वेळापत्रक..
23 मार्च – चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध इंडियन्स
28 मार्च – चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू
30 मार्च – चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध राजस्थान रॉयल्स
5 एप्रिल -चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध दिल्ली कॅपिटल्स
8 एप्रिल – चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध पंजाब किंग्स
11 एप्रिल – चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध कोलकाता नाइट राइडर्स
14 एप्रिल – चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध लखनौ सुपर जायंट्स
20 एप्रिल – चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध मुंबई इंडियन्स
25 एप्रिल – चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध सनराइयजर्स हैदराबाद
30 एप्रिल – चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध पंजाब किंग्स
3 मे – चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू
7 मे – चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स
12 मे – चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध राजस्थान रॉयल्स
18 मे – चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध गुजरात टायटन्स
महत्वाच्या बातम्या :
चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारतीय संघ रचेल का नवा इतिहास?
TNPL ते IPL ; वॉशिंग्टन सुंदरच्या कमाईतील जबरदस्त तफावत, जाणून घ्या
विराट कोहलीच नाही; तर हे दोन खेळाडू देखील बोलणार क्रिकेटला अलविदा?