आगामी चॅम्पियन्स ट्रॉफीचा पहिला सामना (19 फेब्रुवारी) रोजी खेळला जाणार आहे. आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चे आयोजन पाकिस्तान मध्ये केले असले, तरी भारतीय संघाचे सामने दुबईमध्ये खेळले जाणार आहेत. भारताचा पहिला सामना (20 फेब्रुवारी) रोजी बांगलादेश विरुद्ध असेल. याचसाठी 15 सदस्यांचा भारतीय संघ (15 फेब्रुवारी) रोजी दुबईला रवाना झाला आहे.
चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 ची सुरुवात व्हायला अवघे तीन दिवस बाकी आहेत.यापूर्वीच माजी भारतीय क्रिकेटर आकाश चोप्रा यांनी भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली आणि रवींद्र जडेजा यांसंबंधित मोठी भविष्यवाणी केली आहे. ते म्हणाले चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 या तीन अनुभवी खेळाडूंसाठी हा शेवटचा आयसीसी इव्हेंट असू शकतो.
त्यांच्या युट्युब चॅनलवरती बोलत असताना आकाश चोप्रा म्हणाले, वर्ल्ड कप 2027 अजून खूप लांब आहे परंतु असे वाटत आहे की स्वतः खेळाडू देखील मान्य करत आहेत की चॅम्पियन्स ट्रॉफी ही त्यांची शेवटची स्पर्धा असू शकते.पुढे ते म्हणाले, रोहित शर्मा,विराट कोहली आणि रवींद्र जडेजासाठी ही शेवटची मोठी स्पर्धा असण्याची शक्यता आहे.
आकाश चोप्रा असे देखील म्हणाले, प्रश्न हा आहे की खेळाडू 2027 पर्यंत खेळू शकतील की नाही.पण सर्वात मोठा प्रश्न हा आहे की भारतीय क्रिकेट या तिघांशिवाय पूर्ण कसे होईल. त्यांनी सांगितले, खेळाडूचे वय किती आहे यापेक्षा संघाला त्या खेळाडूची गरज कितपत आहे हे पाहणे महत्त्वाचे असते.
टी20 वर्ल्ड कप २०२४ मध्ये भारताच्या ऐतिहासिक विजयानंतर लगेचच रोहित शर्मा विराट कोहली आणि रवींद्र जडेजाने टी20 फॉरमॅटला अलविदा म्हटले होते. आता जेव्हा हे तीनही खेळाडू करिअरच्या शेवटच्या वळणावरती पोहोचले आहेत, तर भरपूर प्रश्नांना उधान आले आहे. हे तीनही खेळाडू चॅम्पियन्स ट्रॉफी नंतर वन डे क्रिकेट मधून सुद्धा संन्यास घेणार का? विराट कोहली आणि रवींद्र जडेजा 36 वर्षांचे आहेत तर रोहित शर्मा चे वय 37 वर्ष आहे.
महत्वाच्या बातम्या:
गंभीर Vs आगरकर; टीम इंडियाच्या यष्टीरक्षक निवडीवर तणाव
अश्विनचा थेट इशारा! संघ निवडीत झाली चूक, भारतीय संघाला होऊ शकतो फटका






