आगामी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेची सुरुवात 19 फेब्रुवारी पासून होत आहे. तत्पूर्वी भारतीय संघाचा माजी खेळाडू रविचंद्रन अश्विनने भारतीय संघाच्या 15 खेळाडूंच्या संघावर प्रश्न उपस्थित केले आहेत. सध्या भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह दुखापतीच्या कारणाने संघाबाहेर पडला आहे. त्याच्या अनुपस्थितीत निवडकर्त्यांनी फक्त तीन गोलंदाजांना संघात स्थान दिले आहे.
तसेच अश्विन या गोष्टीने हैरान आहे की, भारतीय संघ 5 फिरकीपटूंसोबत दुबईकडे का रवाना झाला आहे. प्रथम जेव्हा 15 खेळाडूंची यादी समोर आली तेव्हा चार फिरकीपटू गोलंदाजांना संघात स्थान देण्यात आले होते, पण नंतर बुमराहच्या अनुपस्थितीत वरूण चक्रवर्तीला वनडे सामन्यांमध्ये खेळण्याची संधी देण्यात आली.
आर अश्विन त्याच्या यूट्यूब चॅनेलच्या माध्यमातून निराशा व्यक्त करत म्हणाला की, संघ निवडताना निवडकर्त्यांनी चूक केली आहे. अश्विनच्या म्हणण्यानुसार त्याच्या दृष्टीने भारतीय संघात 2 फिरकीपटू गोलंदाज ठीक आहेत. तसेच त्याने यशस्वी जयस्वालला राखीव यादीत समावेश केल्याने टीका केली.
रविचंद्रन अश्विन म्हणाला, मला हे समजत नाही की ,भारतीय संघ दुबईला 5 फीरकीपटूंसोबत का गेला आहे? संघात 5 फिरकीपटू गोलंदाजाना स्थान देऊन, दुसरीकडे यशस्वी जयस्वालला संघाबाहेर करण्यात आले आहे. मी हे समजू शकतो की साधारण सामन्यांमध्ये 3- 4 फिरकीपटू आपण घेऊन जाऊ शकतो, पण दुबईतल्या सामन्यांसाठी 5 फिरकीपटूंना घेऊन जाणं याबद्दल मी काहीही बोलू शकत नाही.
अश्विनच्या म्हणण्यानुसार भारतीय संघ 2 जास्त फिरकीपटूंसोबत दुबईकडे रवाना झाला आहे. त्यानंतर अश्विन म्हणाला , संघात दोन डावखुरे फलंदाज आणि हार्दिक पांड्या सर्वश्रेष्ठ अष्टपैलू खेळाडू आहे. अक्षर ,जडेजा ,हार्दिक आणि कुलदीप खेळतीलच. पण जर तुम्ही वरूण चक्रवर्तीला देखील खेळवणार आहात तर तुम्हाला एका वेगवान गोलंदाजाला संघाबाहेर ठेवावे लागेल. त्यावेळी हार्दिक पांड्या दुसऱ्या वेगवान गोलंदाजाची भूमिका पार पाडेल. नाहीतर तुम्हाला तिसऱ्या वेगवान गोलंदाजाला संघात आणण्यासाठी एका फिरकीपटू खेळाडूला संघाबाहेर करावे लागेल. अश्विनने हाही प्रश्न उपस्थित केला आहे की, भारतीय संघ दुबईतल्या खेळपट्टीकडून मदत मिळण्याची अपेक्षा ठेवत आहे का?
हेही वाचा
‘या’ 3 संघांच्या हाती अजूनही नाही, चॅम्पियन्स ट्रॉफीचे जेतेपद!
“वनडे वर्ल्ड कप सेमीफायनलमध्ये पोहोचले होते हे संघ, चॅम्पियन्स ट्रॉफीत काय करणार कमाल?”
क्रिकेटप्रेमींसाठी मोठी बातमी! आयपीएल 2025चे वेळापत्रक लवकरच जाहीर होणार





