चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेची सुरुवात 19 फेब्रुवारी पासून होणार आहे. तत्पूर्वी भारतीय संघ बांगलादेशविरुद्ध सामना खेळून आपल्या स्पर्धेला सुरुवात करेल. भारत आणि बांगलादेश दोन्ही संघात 20 फेब्रुवारी रोजी सामना खेळला जाईल. त्यानंतर रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ पाकिस्तान आणि न्यूझीलंड संघाविरुद्ध आपले सामने खेळेल. भारतविरुद्ध पाकिस्तान सामना 23 फेब्रुवारी रोजी खेळला जाईल. तसेच 2 मार्च रोजी भारत-न्यूझीलंड समोरासमोर येतील.
सध्या भारतीय संघासमोर इतिहास घडवण्याची संधी आहे. भारतीय संघ चॅम्पियन्स ट्रॉफी इतिहासातील सगळ्यात यशस्वी संघ ठरू शकतो. जर भारतीय संघ बांगलादेश आणि पाकिस्तानला पराभूत करण्यात यशस्वी ठरला, तर तो चॅम्पियन्स ट्रॉफी इतिहासात सगळ्यात यशस्वी संघ बनेल.
चॅम्पियन्स ट्रॉफी इतिहासात भारतीय संघाने 18 सामने जिंकले आहेत. तसेच जर भारतीय संघाने पाकिस्तान आणि बांगलादेशला आगामी सामन्यांमध्ये हरवले तर , ही संख्या 20 वर पोहोचेल. आत्तापर्यंत चॅम्पियन्स ट्रॉफीच्या इतिहासात कोणत्याही संघाने 20 सामने जिंकले नाहीत. पण भारतीय संघाकडे इतिहास रचण्याची संधी आहे.
भारतीय संघानंतर चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये सगळ्यात जास्त सामने जिंकणाऱ्या संघाच्या यादीत इंग्लंड आणि श्रीलंका संघ दुसऱ्या स्थानी आहेत. या दोन्ही संघांनी स्पर्धेत 14 – 14 सामने जिंकले आहेत. याव्यतिरिक्त दुसऱ्या संघाकडे पाहायचे झाल्यास वेस्टइंडीज ने 13 सामने जिंकले आहेत.
वनडे वर्ल्डकप चॅम्पियन ऑस्ट्रेलिया संघाने चॅम्पियन्स ट्रॉफीच्या इतिहासात 12 सामने जिंकले आहेत. सगळ्यात जास्त सामने जिंकणाऱ्या संघाच्या यादीमध्ये ऑस्ट्रेलिया संघ पाचव्या क्रमांकावर आहे. पाकिस्तान संघाबद्दल बोलायचे झाल्यास त्यांची कामगिरी अत्यंत खराब स्वरूपाची आहे. पाकिस्तानने चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये एकूण 23 सामने खेळले असून ज्यामध्ये 11 सामन्यात त्यांना विजय मिळाला आहे.
भारतीय संघाने 2013 मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती . भारताशिवाय वेस्टइंडीज ,न्यूझीलंड, साऊथ आफ्रिका ,ऑस्ट्रेलिया ,पाकिस्तान आणि श्रीलंका हे संघ चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकण्यात विजयी ठरले आहेत.
हेही वाचा
TNPL ते IPL ; वॉशिंग्टन सुंदरच्या कमाईतील जबरदस्त तफावत, जाणून घ्या
विराट कोहलीच नाही; तर हे दोन खेळाडू देखील बोलणार क्रिकेटला अलविदा?
क्रिकेटप्रेमींसाठी आनंदाची बातमी, आयपीएल 2025चे वेळापत्रक जाहीर…!