---Advertisement---

तब्बल ८ वर्षांनी मुंबई इंडियन्समध्ये परतणार तेंडूलकर, ज्युनीयर तेंडूलकरची झाली सिनीयर तेंडूलकरच्या संघात निवड

On: गुरूवार, फेब्रुवारी 18, 2021 8:43 PM
aRJUN tENDULKAR
---Advertisement---

माजी भारतीय कर्णधार सचिन तेंडूलकरचा पुत्र अर्जुन तेंडूलकर यावर्षी आयपीएलमध्ये खेळताना दिसणार आहे. अर्जुनवर मुंबई इंडियन्स संघाने २० लाखांची बोली लावत आपल्या ताफ्यात सामील केले आहे.

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर २००८ ते २०१३ या काळात मुंबई इंडियन्स संघाकडून आयपीएलमध्ये खेळला होता. सचिन या संघाचा कर्णधारही राहिला होता. तसेच या संघासाठी सचिनने अनेक जबाबदाऱ्याही पार पाडल्या आहेत. त्यामुळे अर्जुनला याच संघात संधी मिळण्याचे तर्क लढविले जात होते व ते अखेर खरे ठरले.

डाव्या हाताने फलंदाजी व डाव्या हाताने गोलंदाजी करणारा अर्जुन एक अष्टपैलू खेळाडू आहे.तो २०२१ मध्येच सईद मुश्ताक अली स्पर्धेत मुंबईच्या वरिष्ठ संघाकडून दोन सामने खेळला आहे. कर्णधार सुर्यकुमार यादवच्या नेतृत्त्वाखाली त्याने १५ जानेवारी २०२१ रोजी हरियाणाविरुद्ध आपले व्यावसायिक पदार्पण केले होते. त्यानंतर १७ जानेवारी रोजी तो आपला दुसरा सामना पॉंडेचेरी संघाविरुद्ध खेळला होता.

सचिनने २०१३मध्ये आयपीएलचा शेवटचा सामना १३ मे २०१३ रोजी खेळला होता. सचिन मुंबईकडून ७८ सामने खेळला असून त्याने ३३.८३च्या सरासरीने २३३४ धावा केल्या आहेत. त्यात सचिनच्या १३ अर्धशतक व एका शतकाचा समावेश आहे.

https://twitter.com/IPL/status/1362412229090570242

नुकतेच त्याने पोलिस आमंत्रण शिल्ड क्रिकेट स्पर्धेतील गट ‘अ’च्या दुसऱ्या फेरीतील सामन्यात त्याने आपल्यातील अष्टपैलू क्षमतेची चुणूक दाखवून दिली.

या सामन्यात त्याने फिरकीपटू हाशिफ दाफेदारच्या एकाच षटकात ५ शानदार षटकार मारले. तर पूर्ण सामन्यादरम्यान अवघ्या ३१ चेंडूत ८ षटकार आणि ५ चौकारांच्या मदतीने नाबाद ७७ धावा चोपल्या. सोबतच ४१ धावा देत ३ विकेट्सही काढल्या होत्या.

याशिवाय अर्जून १९ वर्षांखालील भारतीय संघाकडून ४ दिवसीय कसोटी सामने देखील खेळला आहे. विशेष म्हणजे अर्जूनचे वडील सचिन तेंडुलकरनेही आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स प्रतिनिधित्व केले आहे.

अर्जुन तेंडूलकरची क्रिकेट कारकिर्द-
अर्जुनने आजपर्यंत कोणताही प्रथम श्रेणी अथवा अ दर्जाचा सामना खेळलेला नाही. परंतू त्याने दोन ट्वेंटी ट्वेंटी सामने खेळले असून हे दोनही सामने तो मुंबईकडून खेळला आहे. १५ जानेवारी रोजी हरियाणा व १७ जानेवारी रोजी पॉंडेचरी संघाविरुद्ध तो हे सामने खेळला असून त्याचे व्यावसायिक क्रिकेट केवळ दोन सामन्यांचे आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---